जे. जे. रुग्णालयातील मोबाइल चोराला अटक

जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या चोराचा अन्य एक साथीदार सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जे. जे. रुग्णालयातील मोबाइल चोराला अटक
SHARES

मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या चोराचा अन्य एक साथीदार सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील वार्डात फिरून गाड झोपेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाइल ही टोळी चोरत असल्याचे पुढे आले आहे.


'असा' सापडला चोरटा

वांद्रे येथील पोलिस वसाहतीत राहणारे ५७ वर्षीय विजयकुमार भोईटे उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक १२ मध्ये विजयकुमार यांना ठेवण्यात आलं होतं. ११ नोव्हेंबरच्या रात्री औषधांच्या तीव्रतेमुळे विजयकुमार यांचा डोळा लागला असताना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांचा मोबाइल चोरला. त्यानंतर त्यांनी जे.जे.रुग्णालयातील पोलिसांकडे गुन्हा नोंदवला.


सीसीटीव्हीतून ओळख पटली

त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २ जण विजयकुमार यांच्या बेडजवळ घुटमळताना दिसून आले. पोलिसांनी या दोघांची माहिती काढल्यावर त्यातील एकाची ओळख पटली. त्यानुसार खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी म्हणजेच १० एप्रिल रोजी नरेंद्र मकवाना याला पठाणवाडी भेंडीबाजार येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र त्याचा साथीदार कौशिक सुपत फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नरेंद्रला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

पत्नीच्या अनैतिक संबधाच्या संशयावरुन मित्राची हत्या

वानखेडे स्टेडियम पुन्हा वादात, आयपीएल मॅच दरम्यान तरुणीचा विनयभंग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा