Advertisement

चेंबूरमध्ये बालसुधारगृहाची बत्ती गुल


चेंबूरमध्ये बालसुधारगृहाची बत्ती गुल
SHARES

कोट्यवधींची वीजबिले थकवल्याने अणुशक्तीनगर बस स्थानकासमोरील चेंबूर चिल्ड्रेन्स होम या बालसुधारगृहाचे कार्यालय आणि पदपथावरील दिव्यांची वीजजोडणी वीजवितरक कंपनी रिलायन्सने बुधवारपासून कापली आहे.
बालसुधारगृहातील वसतिगृहांचा वीजपुरवठा मात्र सुरूच ठेवला आहे. वीजबिलाची थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.


थकबाकीने ओलांडला कोटींचा आकडा

चिल्ड्रेन्स अॅड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालसुधारगृहांची पाणी आणि वीजदेयके थकवल्याचे जानेवारी महिन्यात समोर आले होते. पाण्याच्या देयकाची थकबाकी पन्नास लाख इतकी आहे तर, वीजदेयकाच्या थकबाकीने कोटींचा आकडा ओलांडला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या थकबाकीचा भरणा करण्याविषयी रिलायन्सने पूर्वसूचना दिली होती. तो भरणा न केलामुळे मंगळवारी कारवाई करत चेंबूर चिल्ड्रन्स होममधील पथदिव्यांचे आणि कार्यालयाची वीजजोडणी कापण्यात आली.



हेही वाचा -

थकीत बिलांमुळे पोलीस वसाहतींचे पाणी तोडले


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा