Advertisement

अँटिलियात होणार ईशा अंबानीचं लग्न

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ने एक प्रसिद्ध पत्रक काढून ईशा आणि आनंद यांचं लग्न मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरात १२ डिसेंबरला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचंही यांत नमूद करण्यात आलं आहे.

अँटिलियात होणार ईशा अंबानीचं लग्न
SHARES

देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक असलेले रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचं लग्न पीरामल समूहाचे प्रमुख अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्यासोबत ठरलं आहे. या दोघांचं लग्न १२ डिसेंबरला मुंबईत होणार आहे.


'इथं' होणार लग्न

याप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ने एक प्रसिद्ध पत्रक काढून ईशा आणि आनंद यांचं लग्न मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरात १२ डिसेंबरला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचंही यांत नमूद करण्यात आलं आहे.


सिद्धिविनायकाचं दर्शन

मंगळवारी दोघांनीही लग्नापूर्वी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर मुकेश आणि नीता अंबानी यांनी सोमवारी रात्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली तसंच मुलीची लग्नपत्रिकाही बाप्पापुढे ठेवली. याप्रसंगी त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी यांची आई कोकीला अंबानी देखील उपस्थित होते. सर्वांनी पारंपरिक पेहराव केला होता.


'इथं' झाला साखरपुडा

याआधी ईशा आणि आनंद यांचा साखरपुडा इटलीतील प्रसिद्ध तलाव कोमो इथं झाला होता. ३ दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यात बाॅलिवूडमधील अनेक तारे उपस्थित होते. ईशा आणि आनंद यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. आनंदने ईशा हिला महाबळेश्वरमधील एका मंदिरात प्रपोज केलं होतं. ईशाच्या इन्स्टाग्राम फॅनक्लबवर आनंदने तिला प्रपोज करतानाचे फोटो टाकण्यात आले होते.



हेही वाचा-

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?

अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या 'पुड्या'!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा