Advertisement

छत्रपतींच्या स्मारकाअाधी प्रतिकृती उभारणार; मुंबईकर, पर्यटकांची मतं घेणार

प्रतिकृती उभारण्यासाठी फाऊंटन, काळा घोडा, गेटवे ऑफ इंडिया किंवा नरीमन पॉईंट यापैकी एका जागेची निवड करण्यात येणार अाहे. या प्रतिकृतीच्या सहाय्याने तज्ञ, मुंबईकर अाणि पर्यटकांकडून त्यांची मतं अाणि सल्ले जाणून घेण्यात येणार अाहेत.

छत्रपतींच्या स्मारकाअाधी प्रतिकृती उभारणार; मुंबईकर, पर्यटकांची मतं घेणार
SHARES

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार अाहे. मात्र, त्याअाधी अाता दक्षिण मुंबईत स्मारकाची २५ फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येणार अाहे. या प्रतिकृतीच्या सहाय्याने तज्ञ, मुंबईकर अाणि पर्यटकांकडून त्यांची मतं अाणि सल्ले जाणून घेण्यात येणार अाहेत.


गर्दीच्या ठिकाणी प्रतिकृती

प्रतिकृती उभारण्यासाठी फाऊंटन, काळा घोडा, गेटवे ऑफ इंडिया किंवा नरीमन पॉईंट यापैकी एका जागेची निवड करण्यात येणार अाहे. या ठिकाणी पर्यटकांची अाणि मुंबईकरांची गर्दी होत असल्याने यापैकी एक जागा निवडण्यात येईल, असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.


एल अॅण्ड टी कडं कंत्राट

समुद्रात स्मारक उभारण्याचं काम राज्य सरकारने एल अॅण्ड टी कंपनीकडं दिलं अाहे. राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणारं हे स्मारक ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार अाहे. नवीन वर्षांच्या सुरूवातीला स्मारकांचं काम सुरू होण्याची शक्यता अाहे.


पुतळ्याची उंची कमी

राज्य सरकारने यावर्षी बांधकाम खर्चात कपात करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी ७५.७ मीटर होणार अाहे. तर  तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर असेल. तलवारीची उंची वाढवल्याने पुतळ्याची  उंची १२१.२ मीटरच राहणार आहे. या बदलामुळे बांधकाम खर्च ३३८.९४ कोटींनी कमी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी स्मारकाचं भुमीपूजन करण्यात आलं होतं.हेही वाचा - 

कोस्टल रोडच्या कामांसाठी ८ हजार कोटींचं कंत्राट

बाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा