जखमी घोड्यांची मुक्तता

मुंबई - मरिन ड्राइव्ह मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ अनेक पर्यटक, मुंबईकर या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. याच मरीन ड्राईव्हवर पर्यटकांना फिरवण्यासाठी बग्गी असतात. मात्र आता बेदरकार बग्गी चालवणाऱ्या घोडे मालकांवर पेटा आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीयानं कारवाई करत घोड्यांची सुटका केलीय.

पेटा आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडीयानं सुटका केलेल्या तिन्ही घोड्यांची स्थिती दयनीय आहे. हे घो़डे अशक्त असल्याचं डॉक्टर्सनी सांगितंलय.

सध्या हे तिन्ही घोडे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची योग्य ती काळजी घेतली जातेय.

Loading Comments