Advertisement

coronavirus : चीनमध्ये 'असा' आटोक्यात आला कोरोनाचा कहर, आपणही करू शकतो

इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसवर चीननं कसं नियंत्रण मिळवलं? जाणून घ्या हे सांगणारे ९ मुद्दे...

coronavirus : चीनमध्ये 'असा' आटोक्यात आला कोरोनाचा कहर, आपणही करू शकतो
SHARES

कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातलाय. चीनमधून हा व्हायरस दुसऱ्या देशांमध्ये पोहोचला. पण दिलासादायक बातमी म्हणजे जिथून हा व्हायर पसरला तिकडची परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येतेय.

चीनमधली परिस्थिती नियंत्रणात येतेय. गेल्या दोन दिवसांमध्ये चीनमध्ये नवीन रुग्णांची संख्या अक्षरश: कमी झाली आहे. पण इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसवर चीननं कसं नियंत्रण मिळवलं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


'असं' मिळवलं कोरोनावर नियंत्रण 

  • कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यावर लॉक डाऊन करण्यात आलं.

  • जिथून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर निर्बंध लावण्यात आले.
  • शहरातील अनिमल मार्केट म्हणजे मासे आणि मांस विक्री बंद करण्यात आली. याशिवाय शाळा, खाजगी कंपन्या बंद करण्यात आल्या.


  • शहरातील दुकानं, रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात आली. ज्या शहरात रेस्टॉरंट चालू होते तिकडे एका टेबलावर एक किंवा दोन जणांना बसण्याची मर्यादा घालण्यात आली.  
  • निवासी भागांमध्ये कर्फ्यूची कठोर अमलबजावणी करण्यात आली. घरातून कुणाला बाहेर पडण्याची किंवा येण्याची परवानगी नव्हती.
  • चिनी नागरिकांना गर्दीची ठिकाणी जाण्याचा आणि समाज जिवनापासून स्वत:ला दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला.


  • चीनमधल्या सार्वजनिक स्थळांवर 'फेशियल रेकग्निशन' तंत्रज्ञान असलेले कॅमेरे लावण्यात आले. आता या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीतील लोकांचा ताप तपासण्यात आला वा मास्क न घालणाऱ्यांना हेरण्यात आलं.
  • कोरोनाची लागण झालेले पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर रोबोटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. रोबोटच्याच मदतीनं त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पुरवल्या गेल्या.
  • शिचुआन प्रांतात अधिकाऱ्यांना ताप मोजण्यासाठी हेल्मेट्स देण्यात आली. याच्या मदतीनं ५ मीटरच्या परिघातील कोणाचाही ताप मोजता येत होता.  


नियमांचं पालन करा

चीनमध्ये या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं. त्यानंतर चीनमधील परिस्थिती आटोक्यात आली. चीन जवळपास दोन महिने लॉक डाऊन होता. लॉक डाऊन झाल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याचा प्रश्न उद्भवला नाही. त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देखील घरपोच केल्या जायच्या. या सर्व कारणांमुळे तिथला व्हायरस आटोक्यात आला आहे.


महाराष्ट्रात अंशत: लॉक डाऊन

सध्या भारतात पूर्ण लॉक डाऊन केलं गेलं नाही. पण राज्य सरकारकडून वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला गेलाय. पण अजूनही आपण हे मनावर घेतलं नाही. बंद करण्याचे आदेश असताना अजूनही काही कंपन्यांमध्ये काम केलं जातंय. रेल्वे, बसमध्ये काही प्रमाणात लोकं दिसत आहेत. पण जर लोकांनी सरकारचं ऐकलं नाही तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील. 


चीनसारखी वेळ आणू नका

त्यामुळे शक्य असेल तितकं स्वत:ला लोकांपासून लांब ठेवा. घराबाहेर पडणं टाळा. घरात राहूनच या व्हायरसशी लढा देता येणार आहे. सरकारचा सल्ला ऐकाल तरच या व्हायरसला स्वत:पासून दूर ठेवाल. नाहीतर चीनसारखं आपण आठव्या टप्प्यात पोहचू. एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली तर संभाळणं कठिण आहे. 



हेही वाचा 

Coronavirus : धक्कादायक! उल्हासनगरमधील 'ती' कोरोनाबाधित महिला १५०० लोकांच्या संपर्कात

अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाईची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा