Advertisement

अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाईची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर व अनधिकृत नर्सिंग होम आणि हॉस्पिटल असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरिषकर यांनी पालिका आयुक्तांकडे अनेकदा निवेदनाद्वारा केली होती.

अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाईची मागणी
SHARES

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाई  न करणाऱ्या  अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ.देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

 मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर व अनधिकृत नर्सिंग होम आणि हॉस्पिटल असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरिषकर यांनी पालिका आयुक्तांकडे अनेकदा निवेदनाद्वारा केली होती. परंतु याची दखल न घेतल्यामुळे हा विषय आ. देवेंद्र भुयार या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडणार होते. पण अधिवेशन लवकर संपवण्यात आल्याने त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून एम पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त , मुख्य वैद्यकीय अधिकारी , मुख्य अग्निशामक अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. हे अधिकारी जनतेच्या आरोग्याशी खेळत असून अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटल चालू राहणे ही चिंताजनक व गंभीर बाब आहे असं आमदार भुयार यांनी म्हटलं आहे.

 शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 अर्थात दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कलम 8 (2) , कलम 10 (1) , कलम 10 (2) आणि कलम 10 (3) प्रमाणे संबंधित अधिकारी यांचे निलंबन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरिषकर यांनी केली आहे .



हेही वाचा -

ICICI बँक आता तुमच्या घरी

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा