Advertisement

वाचनालयासाठी महापालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा

वाचनालय तोडून शौचालयाचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी चेंबूरच्या एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता.

वाचनालयासाठी महापालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा
SHARES

चेंबुरच्या टिळकनगर परिसरातील वाचनालय उभारण्यात आलं होतं. मात्र हे वाचनालय शौचालयाच्या बांधकामासाठी पाडण्यात आलं. त्यामुळं येथील रहिवाशांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला असून, 'आम्हाला शौचालय नको तर त्या जागी वाचनालय हवे’, अशी मागणी राहुलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व समाज जागृती संघाच्या वतीनं करण्यात आली.

वाचनालय तोडून शौचालयाचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी चेंबूरच्या एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता. चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील शांता जोग मार्गावरील राहुलनगर, पंचशीलनगर, श्रमजीवीनगर येथील रहिवाशांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नागरिकांनी व कामगारांनी एकत्र येत १९९५ साली या ठिकाणी स्वखर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका व वाचनालय सुरू केले. या वाचनालयात आत्तापर्यंत २५०० पुस्तके जमा आहेत.

आठवड्याभरापूर्वी हे वाचनालय तोडण्यात आलं व त्या जागी शौचालय बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यामुळं संतप्त नागरिक व कामगारांनी याविरोधात एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामुळं येथील शौचालयाचं बांधकाम थांबविण्यात आलं. परंतु, २ दिवसांपासून पुन्हा हे बांधकाम सुरू करण्यात आलं. त्यामुळं संतप्त नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येनं मोर्चा काढत एम पश्चिम कार्यालयाबाहेर २ तास ठिय्या दिला.

वाचनालय ज्या परिसरात आहे त्या परिसरात शौचालयदेखील आहे. त्यामुळं नव्यानं शौचालय बांधायची गरज नाही. परंतु, स्थानिक नगरसेवकाला ती जागा बळकवायची असल्यानं इथं मनमानी कारभार सुरू आहे. येत्या १४ एप्रिलच्या आत महापालिकेनं त्या जागेवर वाचनालय उभं केलं नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा येथील रहिवाशांनी दिली आहे.



हेही वाचा -

महिला डब्यांत घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांवर करावाई

मुंबईतील 'या' ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा