Advertisement

पालघरमध्ये एसटी बसला अपघात, ११ प्रवासी गंभीर जखमी


पालघरमध्ये एसटी बसला अपघात, ११ प्रवासी गंभीर जखमी
SHARES

पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात एसटी महामंडळाच्या बसला बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही एसटी बस टेंभी खोडावे इथून सफाळेकडे निघाली होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा ९० प्रवासी जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.


नेमकी कधी घडली घटना?

बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मंजुर्ली गावाजवळ एसटी बस पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्याचा बस चालकाने प्रयत्न केला. मात्र रस्त्याच्या बाजूला निमुळती जागा असल्याने बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पलटली.


प्रकृती स्थिर

या अपघातामध्ये बसमध्ये बसलेल्या ११ प्रवाशांना गंभीर मार लागला. त्यानंतर जखमींना त्वरीत सफाळेतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाने सांगितलं.



हेही वाचा-

लोकलमध्ये पुन्हा स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल

कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, लोकांनी वाचवलं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा