Advertisement

नाले, रस्ते बनवणारे कंत्राटदार वळले ‘शिक्षणा’कडे

महापालिकेत यापूर्वी कंत्राटदारांनी यापूर्वी केलेल्या कामांनुसार त्याच संबंधित कामांसाठी त्यांची निवड केली जायची. परंतु दुसऱ्या कामांचा अनुभव असल्यास, त्यांना अन्य विभागांची कामे बहाल केली जात नसत. पण आता महापालिकेची किरकोळ कामं मिळवल्यानंतर तो कंत्राटदार कोणत्याही कामासाठी निविदा भरून काम मिळवू शकतो.

नाले, रस्ते बनवणारे कंत्राटदार वळले ‘शिक्षणा’कडे
SHARES

मुंबई महापालिकेतील सर्व खात्यांमध्ये असणाऱ्या कंत्राटदारांची मक्तेदारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मोडीत काढली आहे. त्यामुळे आता कोणत्याही कामाचा अनुभव असलेला कंत्राटदार कोणत्याही कामांसाठी पात्र ठरू लागला आहे. त्यामुळेच नाले आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांनी शिक्षणचा मार्ग स्वीकारत शाळांच्या दुरुस्तीची कंत्राटं पदरात पाडून घेतली आहेत.


कुठल्या शाळांची दुरूस्ती?

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अनेक शाळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. यामध्ये भांडुप टेंबीपाडा शाळा, कुर्ला एच.पी. केळुस्कर शाळा, मालाड नेमाणी प्लॉट महापालिका शाळा, आकुर्ली मार्ग महापालिका शाळा, विक्रोळी पार्कसाईड अप्पर डेपो पाडा आदी शाळांच्या दुरूस्ती व सुधारणा करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु या शाळांच्या दुरुस्तीची कंत्राटं ही चक्क रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरण, पावसाळी नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी मिळवली आहेत.


कुठल्याही कामांसाठी निविदा

महापालिकेत यापूर्वी कंत्राटदारांनी यापूर्वी केलेल्या कामांनुसार त्याच संबंधित कामांसाठी त्यांची निवड केली जायची. परंतु दुसऱ्या कामांचा अनुभव असल्यास, त्यांना अन्य विभागांची कामे बहाल केली जात नसत. पण आता महापालिकेची किरकोळ कामं मिळवल्यानंतर तो कंत्राटदार कोणत्याही कामासाठी निविदा भरून काम मिळवू शकतो, अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने आता कोणताही कंत्राटदार कुठेही कामं मिळवू लागला आहे.


शिक्षण विभागात प्रस्थ

त्यात रस्ते आणि पावसाळी गटारांच्या बांधकामांमध्ये प्रशासनाचा विशेष लक्ष असल्यामुळे ही कामे करणारे कंत्राटदार आता शालेय इमारतींच्या दुरुस्तीची कामे मिळवून आपले महापालिकेतील अस्तित्व तसेच प्रस्थ वाढवताना दिसत आहेत. कंत्राटदार आणि त्यांना आता मिळालेली कामे व यापूर्वी त्यांनी केलेली कामांचा


कंत्राटदारांचा तपशिल

कंत्राटदार: आशापुरा कन्स्ट्रक्शन कंपनी
भांडुप टेंबीपाडा महापालिका शाळेची दुरुस्ती व सुधारणा (१.३८ कोटी)
यापूर्वी केलेलं काम : पूर्व व पश्चिम उपनगरातील पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्तीची किरकोळ कामे

कंत्राटदार: धीरज एंटरप्रायझेस
कुर्ला एच.पी. केळुस्कर शाळा दुरुस्ती व सुधारणा (२.५५ कोटी)
यापूर्वी केलेलं काम : सिमेंट क्रॉकीटचा रस्ता, विमल नगर

कंत्राटदार: प्रगती एंटरप्रायझेस
मालाड नेमाणी प्लॉट महापालिका शाळा दुरुस्ती व सुधारणा (३.२६ कोटी)
यापूर्वी केलेलं काम :भायखळा बॅ. नाथ पै मार्गाचे सिमेंटीकरण

कंत्राटदार: एम.बी. ब्रदर्स
आकुर्ली मार्ग महापालिका शाळा दुरुस्ती व सुधारणा (३.७६ कोटी)
यापूर्वी केलेलं काम: के-पश्चिम विभागातील नादुरुस्त पर्जन्य जलवाहिन्यांची कामे

कंत्राटदार: भैरव कन्स्ट्रक्शन
विक्रोळी पार्कसाईड अप्पर डेपोपाडा, शाळेची दुरुस्ती व सुधारणा (१.४३ कोटी)
यापूर्वी केलेलं काम :परिमंडळ ३ मधील संगणक प्रयोगशाळेची उभारणी

कंत्राटदार: शारूंजय एंटरप्रायझेस
दहिसर पूर्व जकात नाका येथील संरक्षक भिंतीचं काम
यापूर्वी केलेलं काम: वडाळा येथील रमा माता आंबेडकर उद्यानातील पायवाटांची दुरुस्ती



हेही वाचा-

रस्ते चौकशीचा अहवाल गेला कुठे?

रस्ते घोटाळ्यावर शिवसेना, भाजपाचे मौन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा