Advertisement

राणीबागेतील महापौर बंगल्याचा रस्ता मोकळा, अतिरिक्त आयुक्तांनी खाली केला बंगला


राणीबागेतील महापौर बंगल्याचा रस्ता मोकळा, अतिरिक्त आयुक्तांनी खाली केला बंगला
SHARES

दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत असल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर लवकरच राणीबागेतील बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी राणीबागेतील बंगला खाली केल्याने नव्या महापौर बंगल्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


सामान हलवलं

महापौरांचं नवं निवासस्थान म्हणून भायखळ्याच्या राणीबागेतील बंगला निश्चित करण्यात आला आहे. आतापर्यंत या बंगल्यात अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड रहात होते. मात्र जऱ्हाड यांनी हा बंगला खाली केला असून बुधवारी बंगला आैपचारिकरित्या खाली करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.


डागडुजीचं काम

राणीबागेतील हा बंगला एकूण ६ हजार चौ.फूट. क्षेत्रफळाचा आहे. महापौरांच्या आवश्यकतेनुसार या बंगल्याची डागडुजी, रंगरंगोटी, आणि नूतनीकरणाचं काम लवकरच बीएमसीकडून हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच महाडेश्वर या बंगल्यात प्रवेश करतील.



हेही वाचा-

शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याची एक इंचही जागा देणार नाही- राज ठाकरे

'महापौरांचा निवास' राणीबागेतच, बंगल्याची डागडुजी सुरू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा