Advertisement

टाकाऊ कचऱ्यापासून 'इथं' साकारणार रॉक गार्डन

चंढीगडच्या धर्तीवरमहापालिका मुंबईत रॉक गार्डन उभारणार आहे. सर्वात महत्त्वाचं हे रॉक गार्डन कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहे.

टाकाऊ कचऱ्यापासून 'इथं' साकारणार रॉक गार्डन
SHARES

पंजाबमध्ये फिरायला गेलो की चंदीगडच्या रॉक गार्डनला पर्यटक नक्कीच भेट देतात. पण आता चंदीगडसारखं रॉक गार्डन मुंबईत सुद्धा पाहायला मिळू शकतं. चंदीगडच्या धर्तीवर महापालिका मुंबईत रॉक गार्डन उभारणार आहे. सर्वात महत्त्वाचं हे रॉक गार्डन कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहे.

महासभेत मंजूरी

मुंबईत दिवसाला सात हजाराहून अधिक मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप सुक्या कचऱ्याची समस्या कायम आहे. सुक्या कचऱ्यात मातीची भांडी, काचेच्या बांगड्या, निरुपयोगी विद्युत उपकरणं, सिमेंटच्या पिशव्या अशा सुक्या कचऱ्यापासून रॉक गार्डन साकारण्याची मागणी पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती.

मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये सुका कचऱ्याचे म्हणजेच प्लास्टिक, काच असा वस्तूंचं वर्गीकरण करण्यात येतं. या कचऱ्यापासून रॉक गार्डन सुरू करण्याचा प्रस्ताव घनकचरा विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे.

टाकाऊपासून टिकाऊ

पंजाब इथल्या चंदीगड शहरात रॉक गार्डन साकारण्यात आलं आहे. यात टाकाऊ वस्तूंपासून प्राणी, पक्षी, बाहुली अशा प्रतिकृती टाकाऊ कचऱ्यापासून साकारण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

मुंबईत लवकरच उभारणार ज्वेलरी पार्क

६९ वर्षांचे आजोबा 'असा' देतायेत फटाके न फोडण्याचा संदेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा