Advertisement

'नागरी सुविधा केंद्रात नव्या नोटांची अदलाबदली'


SHARES

मुंबई - पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातून नव्या नोटा गायब होत असल्याचा पर्दाफाश मनसे गटनेता संदीप देशपांडे यांनी बुधवारी स्थायी समितीत केलाय. त्यामुळे पालिकेचे नागरी सुविधा विभाग हे नोटा बदलीचे केंद्र बनल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. शासनाचे विविध कर अदा करण्यासाठी 8 ते 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेतील नागरी सुविधा केंद्रात जुन्या नोटा देऊन विविध कर भरण्यात आले. मात्र पालिकेच्या टी विभागातील केंद्रात 16 नोव्हेंबर रोजी भरण्यात आलेल्या विविध करांमध्ये 2000 रुपयांच्या 7 नोटा भरण्यात आल्या होत्या. पालिकेकडून जमलेला भरणा हा एचडीएफसी बँकेत केला जातो. मात्र त्या दिवशी एचडीएफसी बँकेत दोन हजार रूपयांच्या नोटांचा भरणा केला नसल्याची धक्कादायक बाब संदीप देशपांडे यांनी पुराव्यासहित स्थायी समिती समोर आणली. नोटा बदली करण्याची पालिकेत एक माफिया टोळी असून, इतर नागरी सुविधा केंद्रातही हा प्रकार झाला असावा असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय