Advertisement

महापौरपदाची मुदत २१ नोव्हेंबरला येणार संपुष्टात


महापौरपदाची मुदत २१ नोव्हेंबरला येणार संपुष्टात
SHARES

मुंबईचे महापौर विश्ननाथ महाडेश्वर यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर महापालिकेत आता नव्या महापौरांच्या निवडीचे वेध लागले आहेत. विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिलेली वाढीव मुदत येत्या २१ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं पालिकेनं आता नव्या महापौरांच्या निवडीची तयारी सुरू केली आहे.

सन २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ९ मार्चला निवडणुका होऊन विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची महापौर म्हणून घोषणा करण्यात आली. त्यांनंतर त्यांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ८ सप्टेंबरलाच संपला होता. तेव्हापासूनच नव्या महापौरांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. परंतु, ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळं महापौरांना ३ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व येथून निवडणूक लढवली होती. ही निवडणूक ते जिंकले असते तर महापौरपदावर असताना आमदार झाल्याचा मान त्यांना मिळाला असता. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले असले तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे नवीन महापौरांच्या निवडीसाठी राज्याच्या नगरविकास विभागानं अद्याप याबाबत अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळं पालिकेच्या चिटणीस विभागाचं लक्ष या अधिसूचनेकडं लागलं आहे.

राज्यातील २६ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास खात्यानं अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर येत्या काही दिवसांत चिटणीस विभागामार्फत नगरविकास विभागामार्फत याबाबत पाठपुरावा केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत कधी निघेल याचीही तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र नवीन महापौर २२ नोव्हेंबपर्यंत नियुक्त करावे लागणार आहे.हेही वाचा -

शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदात वाटा मागितल्यामुळेच तिढा - मुनगंटीवारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय