Advertisement

मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश

नागरिकांनी 4 पेक्षा जास्त व्यक्तींनी बाहेर एकत्र जमू नये, दोघांमधील अंतर कमीत कमी 6 फुटाहून अधिक ठेवावं अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईत जमावबंदीच्या आदेशाची तारीख पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे 31 सप्टेंबरपर्यंत आता मुंबईत पुन्हा जमावबंदी राहणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. यात नागरिकांनी 4 पेक्षा जास्त व्यक्तींनी बाहेर एकत्र जमू नये, दोघांमधील अंतर कमीत कमी 6 फुटांहून अधिक ठेवावं अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांच्या वर गेली आहे. अशातच महाराष्ट्र अनलॉक 4 आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचं चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाचा संक्रमणाचे प्रमाण वाढू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पून्हा एकदा 144 जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश लागू करताना पोलिसांनी काही नियम देखील घालून दिलेले आहेत. ज्या परिसराला कटेंन्मेट झोन डिक्लेर केले आहे. त्या नागरिकांनी आवश्यकता असल्यावरचं बाहेर पडावं. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी प्रवास टाळावा. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी दोन व्यक्तींमध्ये 6 फूट अंतर ठेवावं. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर 188 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

हेही वाचाः- पोलीस भरतीत मराठा समाजाला १३ टक्के जागा? सरकारने दिलं ‘हे’ आश्वासन

मुंबईचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी 16 सप्टेंबर रोजी हे आदेश पारित केले असून पुढे हे आदेश 31 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  

हेही वाचाः- भारतात कोरोना व्हॅक्सीन 'या' दिवशी उपल्बध होणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा