Advertisement

भारतात कोरोना व्हॅक्सीन 'या' दिवशी उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

भारत इतर देशांप्रमाणेच प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा एक गट यावर लक्ष ठेवून आहे.

भारतात कोरोना व्हॅक्सीन 'या' दिवशी उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती
SHARES

देशातील कोरोनाच्या वाढते आकडे पाहता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लसीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस भारतात उपलब्ध होईल.

हर्षवर्धन म्हणाले की, भारत इतर देशांप्रमाणेच प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा एक गट यावर लक्ष ठेवून आहे. लसीसाठी सरकार चांगल्या योजना आखत आहेत.

राज्यसभेत बोलतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, एक काळ असा होता की भारतात मास्क, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनसारख्या सुविधा पुरश्या प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. जुलै-ऑगस्टपर्यंत भारतात ३० कोटी लोकांना कोरोना होईल आणि ५० ते ६० लाख लोकांचा मृत्यू होईल, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. पण परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. जगातील बऱ्याच देशांपेक्षा भारत चांगल्या स्थितीत आहे.

आरोग्यमंत्री हे देखील म्हणाले की, सध्या अमेरिका भारतापेक्षा जास्त चाचणी करत आहे. पण भारत देश लवकरच त्यांना पण मागे टाकेल. सध्या भारतात कोरोनाच्या तपासणीसाठी ११ दशलक्ष चाचण्या घेण्यात येत आहेत.

यापूर्वी हर्षवर्धन म्हणाले होते की, “जर तुम्हाला लसीशी संबंधित सरकार, वैज्ञानिक आणि सर्व वैज्ञानिक प्रक्रियेवर विश्वास नसेल तर मी तुम्हाला हमी देतो की हा विश्वास बळकट करण्यासाठी मी प्रथम लस घेईन. देशाचे हित आणि लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रत्येक आवश्यक पावले उचलण्यास मी तयार आहे."

आपण संपूर्ण देशाबद्दल चर्चा केली तर संक्रमित लोकांची संख्या दररोज वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची नवीन संख्या ९७ हजार ८९४ इतकी आहे. त्यात १ हजार १३२रुग्णांचा मत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णांची संख्या ५१ लाख १८ हजार २५३ इतकी आहे. तर ८३ हजार १९८ इतकी आहे.हेही वाचा

रशिया देणार भारताला कोरोना वॅक्सीनचे १०० दशलक्ष डोस

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी

Read this story in हिंदी
संबंधित विषय