Advertisement

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांची भरती, 'इतक्या' जागा भरणार

याआधी पालिकेने कक्ष परिचर (वॉर्डबॉय) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आता सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांची भरती, 'इतक्या' जागा भरणार
SHARES

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांची ३२० पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने अर्ज मागवले आहेत. रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले लक्षात घेऊन ही भरती करण्यात येणार आहे.

याआधी पालिकेने कक्ष परिचर (वॉर्डबॉय) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आता सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार आहे. पालिकेच्या मालमत्ता, कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागावर आहे. सुरक्षा रक्षक विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे पालिकेने कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

कोरोनामुळे सध्या पालिका रुग्णालयांमध्ये आणीबाणीची स्थिती आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची नितांत आवश्यकता आहे.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेल्या कक्ष परिचरांची ११४ पदेही भरण्यात येणार आहेत. आता ३२० सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षा रक्षकांना २५ हजार रुपये वेतन देण्यात येणार असून २८ एप्रिल २०२० पर्यंत cso.security@mcgm.gov.in वर अर्ज पाठवावा, असं आवाहन पालिकेकडेून करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

क्वॉरन्टाईन सेंटरसाठी मुंबई महापालिकेच्या शाळा

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये एकही नवीन रूग्ण नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा