'त्या' ४ सुरक्षा रक्षकांवरील निलंबन मागे

सुरक्षा रक्षकांना या प्रकरणी समज देण्याऐवजी त्यांना थेट निलंबित केल्याची दखल घेऊन 'मुंबई लाइव्ह'ने हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणावर खुलासा करताना काही सुरक्षा रक्षकांवर गैरसमजातून कारवाई झालेली दिसते. ही कारवाई तातडीने रद्द करण्याचे निर्देश 'प्रमुख सुरक्षा अधिकारी' यांना देण्यात आल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.

SHARE

मुंबई महापालिका आयुक्तांना वाहनकोंडीचा त्रास सहन करावा लागला म्हणून महापालिका मुख्यालयातील ४ सुरक्षा रक्षकांचं गुरूवारी सकाळी तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं. या निलंबनाचं वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध करताच अवघ्या काही तासांमध्येच हे निलंबन मागे घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले.

गैरसमजातून कारवाई

सुरक्षा रक्षकांना या प्रकरणी समज देण्याऐवजी त्यांना थेट निलंबित केल्याची दखल घेऊन 'मुंबई लाइव्ह'ने हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणावर खुलासा करताना काही सुरक्षा रक्षकांवर गैरसमजातून कारवाई झालेली दिसते. ही कारवाई तातडीने रद्द करण्याचे निर्देश 'प्रमुख सुरक्षा अधिकारी' यांना देण्यात आल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.

कारवाईचे निर्देश नाही

महापलिका मुख्यालयाजवळील गेट क्रमांक ५ ते 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या इमारती दरम्यान असणाऱ्या छोट्या रस्त्यावर एक जरी वाहन वेडेवाकडं लावलं, तरी तिथं लगेच वाहतूककोंडी होते. हा अनुभव अनेकदा आल्यानंतर 'प्रमुख सुरक्षा अधिकारी' यांना केवळ वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते, कुणावरही कारवाईचे निर्देश दिले नव्हते. परंतु, गैरसमजातून काही सुरक्षा रक्षकांवर कारवाई झालेली दिसते. ती तातडीने रद्द करण्याचे निर्देश 'प्रमुख सुरक्षा अधिकारी' यांना देण्यात आल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

पालिका आयुक्तांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सुरक्षारक्षक निलंबित

जोगेश्वरी भूखंडप्रकरणी पालिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयातसंबंधित विषय
ताज्या बातम्या