Advertisement

Mumbai Airport: मेट्रोमुळे मुंबई विमानतळावरील सर्व्हर झाला डाऊन, वाचा सविस्तर

मुंबई विमानतळावरील सर्व्हरमधील तांत्रिक अडचण रात्री ७.२० वाजता दूर करण्यात आली.

Mumbai Airport: मेट्रोमुळे मुंबई विमानतळावरील सर्व्हर झाला डाऊन, वाचा सविस्तर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरु असलेल्या मेट्रोचा कामामुळे सर्व्हर वायर तुटल्याने विमातळावरील सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांच्या प्रवाशांना चेक इन करताना मोठ्या उशीर होत होता. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी मॅन्युअल प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानंतर मुंबई विमानतळावरील सर्व्हरमधील तांत्रिक अडचण रात्री ७.२० वाजता दूर करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. गुरुवारी (ता.०१) सायंकाळी ५. ३० वाजताच्या सुमारास मेट्रोचा काम दरम्यान सर्व्हरची वायर तुटल्याने विमातळावरील सर्व्हर डाऊन झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर विमातळावरील संगणक प्रणाली ठप्प पडली. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांच्या प्रवाशांना चेक इन करताना मोठा अडचणीचा समोर जावे लागले होते.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांचा सोयीसाठी चेक इन करिता मॅन्युअल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व विमान प्रवाशांनी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व्हरमधील तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

गर्दीमुळे संतप्त महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ

mumbai"="" target="_blank">Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबरला वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जाहीर, वाचा कुठले रस्ते बंद">Mumbai Traffic Update: मुंबईत उद्या वाहतुकीत बदल, वाचा कुठले रस्ते बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा