Advertisement

ठाण्यातील 'या' भागात २० नोव्हेंबरला १२ तास पाणी कपात

ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी शहरातील दुरुस्तीच्या कामाची आखणी केली आहे.

ठाण्यातील 'या' भागात २० नोव्हेंबरला १२ तास पाणी कपात
SHARES

ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी शहरातील दुरुस्तीच्या कामाची आखणी केली आहे. हे लक्षात घेऊन प्रशासकिय संस्थेनं सांगितलं आहे की, परिसरातील अनेक भागात १२ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत रहिवाशांची गैरसोय होऊ शकते.

टीएमसीनं सांगितलं की, उच्च वोल्टेज पॉवर सबस्टेशनच्या फीडरवर बारवी जलशुद्धीकरण इथं दुरुस्तीचे काम केलं जाईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दिवसभरात कामकाज करतील आणि त्याच कारणास्तव पाणीपुरवठा खंडित केला जाईल.

खालील भागांमध्ये / प्रभागांमध्ये पुरवठा बाधित होणार असल्यानं रहिवाशांना आवश्यक त्या व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

 • दिवा
 • कळवा
 • मुंब्रा
 • नालपाडा
 • वर्तकनगर
 • वागळे
 • लोकमान्य-सावरकरनगर परिसर
 • केनिनगर
 • किसन नगर क्रमांक 2
 • नेहरू नगर
 • रुपादेवीपाडा
 • माजिवडा-मानपाडा परिसर
 • बाल्कम
 • कोलशेत गाव

त्याशिवाय सायंकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तथापि, रहिवाशांना हे लक्षात घ्यावं लागेल की, पुढील ४८ तास दबाव कमी असेल. आवश्यकतेनुसार पाणी साठवून घ्यावं आणि शहाणपणानं त्याचा वापर करावा यासाठी टीएमसीनं लोकांना विनंती केली आहे.हेही वाचा

महावितरण : ६४ लाखाहून अधिक ग्राहकांनी एप्रिलपासून वीज बिले भरली नाहीत

जी दक्षिण विभागात फुटली जलवाहिनी; दुरुस्तीच्या कामात कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा