Advertisement

शिवडी - एलिफंटा रोप वे प्रकल्प रखडला, 'हे' आहे कारण

शिवडी ते एलिफंटा (Shivadi to Elephanta) हा समुद्रातील (sea) ‘रोप वे’ (Rope Way) प्रकल्प रखडला आहे.

शिवडी - एलिफंटा रोप वे प्रकल्प रखडला, 'हे' आहे कारण
SHARES

शिवडी ते एलिफंटा (Shivadi to Elephanta) हा  समुद्रातील (sea) ‘रोप वे’ (Rope Way) प्रकल्प रखडला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने (Central Archaeological Department) परवानगी दिली नसल्याने या रोप वेचं काम २ वर्षांपासून सुरूच झालेलं नाही. 

जानेवारी २०१८ मध्ये शिवडी  (Shivadi) येथील हाजी बंदर ते एलिफंटा (Elephanta) या समुद्रातील ८ किमी लांबीच्या रोप वे (Rope Way) ची संकल्पना मांडण्यात आली होती. या रोप वे प्रकल्पामध्ये ५० ते १५० मीटर उंचीच्या ८ ते ११ खांबांचा वापर करण्यात येणार आहे. हा रोप वे जगातील समुद्रावरील (sea) सर्वात लांब रोप वे ठरणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ६०० कोटी रुपये आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या रोप वेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात येणार आहे. या रोप वे प्रकल्पाला अद्याप पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे याच्या कामासा अद्याप सुरूवात झालेली नाही. 

एलिफंटा बेटावर (Elephanta Island) सातव्या शतकातील शैव लेणी आहेत. त्या ठिकाणी बांधकाम करण्यास पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार अनेक बंधने आहेत. सध्या गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथून लाँचने एलिफंटा बेटावर जावे लागते. ७ लाख पर्यटक दरवर्षी एलिफंटाला भेट देतात. रोप वेचा प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ १४ मिनिटांत एलिफंटाला जाता येणार आहे.  रोप वेच्या एका ट्रॉलीमधून एकावेळी ३० पर्यटक जाऊ शकतात.

 डिसेंबर २०२० मध्ये हा रोप वे (Rope Way) सुरू होण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र अद्यापही परवानग्याच मिळू न शकल्यामुळे प्रकल्पाचे कामच सुरू होऊ शकले नाही. यासाठी दोन जागतिक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. तसेच जानेवारी २०१८ मध्ये पर्यावरण परवानग्यांसाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही.


हेही वाचा  -

पालिकेचे 'हे' दवाखाने रात्री ११ पर्यंत खुले राहणार

पाणथळीवरील १५० झोपड्या पालिकेने तोडल्या
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा