Advertisement

पालिकेचे 'हे' दवाखाने रात्री ११ पर्यंत खुले राहणार

मुंबई (mumbai) तील नागरिकांना आता संध्याकाळीही मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

पालिकेचे 'हे' दवाखाने रात्री ११ पर्यंत खुले राहणार
SHARES

मुंबई (mumbai) तील नागरिकांना आता संध्याकाळीही मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. या आठवड्यापासून पालिकेचे १५ दवाखाने (hospital) संध्याकाळी ४ ते ११ या वेळेत खुले राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही. 

पालिकेचे (Mumbai Municipal Corporation) मुंबईत १७५ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते ४ या वेळेत प्राथमिक आरोग्य सेवा (Primary health care) दिली जाते. संध्याकाळी दवाखाने (hospital) सुरू नसल्याने नोकरीवर जाणाऱ्यांना पालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचार घेता येत नाही. त्यामुळे संध्याकाळी या रुग्णांना मुख्य किंवा उपनगरीय रुग्णालयात जावे लागते. परिणामी मुख्य किंवा उपनगरीय रुग्णालयांवर मोठा भार येतो. संध्याकाळी चार वाजल्यानंतरही आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक खासगी तत्त्वावर शहरातील दवाखाने संध्याकाळी ४ ते ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ मध्ये घेतला गेला. यासाठी १५ दवाखान्यांची निवडही केली होती.दवाखाने संध्याकाळी सुरू करण्यासाठी २०२०-२१  या वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये १.२८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.


या आठवड्यापासून हे दवाखाने (hospital) संध्याकाळी खुले राहतील. रुबी अल्केअर संस्थेच्या मदतीने दवाखाने संध्याकाळी चालू राहतील. दवाखान्यातील पायाभूत सुविधा पालिकेच्या असणार आहेत. तर डॉक्टरसह निमवैद्यकीय कर्मचारी रुबी अल्केअर संस्थे असतील. आवश्यक औषधांचा साठा  पालिका पुरवेल.  यात त्या दिवसापुरतीच औषधे दिली जातील. पुढील औषधे घेण्यासाठी रुग्णांना सकाळच्या वेळेत दवाखान्यात यावे लागेल. प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी म्हणून हा प्रयोग केला जात आहे. पुढील टप्प्यांमध्ये ३५ दवाखाने संध्याकाळी सुरू केले जातील, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. 

सायंकाळी सुरू राहणारे दवाखाने 

  • कुलाबा पालिका दवाखाना
  • वालपाखडी पालिका दवाखाना
  •  बने कंपाऊंड पालिका दवाखाना ल्ल रावळी कॅम्प, सायन कोळीवाडा
  • वडाळा पालिका दवाखाना
  • बीडीडी चाळ पालिका दवाखान
  • साऊटर स्ट्रीट पालिका दवाखाना
  • कलिना दवाखाना, सांताक्रूझ
  • जुना खार दवाखाना
  • एन.जे.वाडिया दवाखाना, अंधेरी(पश्चिम)
  • चोकसी दवाखाना
  • गोराई म्हाडा दवाखाना
  •  चुनाभट्टी दवाखाना
  • रमाबाई आंबेडकर पालिका दवाखाना
  • कांजुरगाव दवाखाना

हेही वाचा -

पाणथळीवरील १५० झोपड्या पालिकेने तोडल्या

म्हाडा बांधणार नॅनो घरे, किंमत असणार ‘इतकी’




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा