Advertisement

भीमा कोरेगाव हिंसाचार: सोशल मीडियावर #ShameOnCm मोहीम


भीमा कोरेगाव हिंसाचार: सोशल मीडियावर #ShameOnCm मोहीम
SHARES

भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली असताना, जाळपोळ होत असताना, तरूणाला जीवंत जाळलं जात असताना, पुणे पेटलेलं असताना ज्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा भार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते? असा प्रश्न करत सोशल मीडियावर नेटिझन्सने #ShameOnCm मोहीम सुरू केली आहे. सायंकाळी ६ ते रात्री रात्री ९ या वेळेत #ShameOnCm अशी मोहीम राबवली जाणार असून भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा राग व्यक्त करण्यात येत आहे.


मोहीम का?

भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजय स्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून विरोध होत होता. दंगलीचं प्लानिंग ७ दिवसांपासूनच होत होतं, असं असताना सरकार आणि पोलिसांकडून कोणतंही पाऊल उचलण्यात आले नसल्याचा आरोप दलित संघटना आणि आंबेडकर अनुयायांकडून होत आहे. तर भिमा कोरेगावला दंगल उसळली असताना मुख्यमंत्र्यांकडून याची साधी दखलही घेण्यात आली नाही, असाही आरोप संघटनांकडून होत आहे.



६ ते ९ दरम्यान

या धर्तीवर या घटनेसह मुख्यमंत्र्यांबद्दल असलेला राग व्यक्त करण्यासाठी काही नेटीझन्सनी एकत्र येत सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत #ShameOnCm ही मोहीम फेसबुक आणि ट्विटरवर राबवली आहे. या मोहिमेला नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.



हेही वाचा-

Live Update: भीमा-कोरेगाव दगडफेकीचे मुंबईत पडसाद, बेस्ट फोडल्या

हिंदू एकता अाघाडी, शिवराज प्रतिष्ठानने दंगल घडवली - प्रकाश अांबेडकरांचा अारोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा