Advertisement

कर्नल प्रेमचंद यांना शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२० घोषित

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिखर सावरक पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला.

कर्नल प्रेमचंद यांना शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२० घोषित
SHARES

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिखर सावरक पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला. यंदा प्रथमच या सोहळ्यात शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२० कर्नल प्रेमचंद यांना घोषित करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा पुरस्कार सोहळा ऑनलाईल पार पडला. या सोहळ्यामध्ये ३ महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले. ऑनलाईन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर, राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तर राज्याच्या सीआयडी विभागाचे प्रमुख व अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी होते.

'देशभक्तीचा प्रसार व प्रचार यासाठी प्रयत्न करीत असून पर्वतारोहणाचं हे क्षेत्र त्यामधीलच एका प्रयत्नाचा भाग आहे. यामधून २०१५ मध्ये स्मारकाने मोहीम हाती घेतली व हिमाचल प्रदेशातील निनावी शिखर स्मारकाच्या चमूने मोठ्या हिकमतीने सर केले. ते शिखर त्यावेळी सावरकर यांच्या नावाने तिथं भारताचा ध्वज व सावरकरांनी तयार केलेला ध्वज लावून सर केलं. तो २३ ऑगस्ट हा दिवस होता', असं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पुरस्कार सोहळ्यावेळी म्हटलं.

हिमालय पर्वतरांगेमधील कर्चा नाला येथील बातलस्थित स्पिती व्हॅलीतील अनामिक (अननेम्ड) आणि आजवर पादाक्रांत न केलेलं असं हे शिखर असून ते स्मारकाच्या चमूने सर केलं. देवेंद्र गंद्रे व राजेंद्र वराडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम ७ जणांनी यशस्वी केली आणि या शिखराची ओळख आता ‘शिखर सावरकर’ अशी झाली असून हे नाव आता अजरामर झालं आहे. या मोहिमेला २३ ऑगस्ट २०२० रोजी ५ वर्षे पूर्ण होत असून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सावरकर स्मारकातर्फे  शिखर सावरकर उदयोन्मुख गिर्यारोहक पुरस्कार (युथ अॅडव्हेंचर), शिखर सावरकर दुर्ग संवर्धक संस्था (युथ टीम अॅडव्हेंचर), शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. हे पुरस्कारांचं पहिलं वर्ष आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

'पर्वतारोहण म्हणजे केवळ क्रीडा प्रकार वा एक कृती नाही तर ते जीवनाचं एक तत्वज्ञानच आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, भयरहीत मन व मानसिक बळ तसंच प्रशिक्षणानं भारलेलं बळकट शरीर याची गरज असते. कर्नल प्रेमचंद यांनी या गुणांच्या शिखरावर पाऊल रोवलं व त्यातूनच गिर्यारोहणामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिलं. कांचनगंगा शिखर मोहिमेचे ते नायकच होते', अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी कर्नल प्रेमचंद यांचा गौरव केला.



हेही वाचा -

यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा