कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले साईबाबा! शिर्डी देवस्थानची 'इतक्या' कोटींची मदत

ही मदत राज्य सरकारकडे न्यायालयानं नेमलेल्या कमिटीच्या निर्णयानंतर देण्यात येणार आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले साईबाबा! शिर्डी देवस्थानची 'इतक्या' कोटींची मदत
SHARES

आता शिर्डी देवस्थान संस्थानही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलं आहे. राज्य सरकारला शिर्डी देवस्थानच्या वतीनं ५१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही मदत राज्य सरकारकडे न्यायालयानं नेमलेल्या कमिटीच्या निर्णयानंतर देण्यात येणार आहे. तसंच संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी देवस्थानच्या वतीनं मोफत अन्नदानही करण्यात येणार आहे.


शिर्डी देवस्थानची मदत

कोरोनाच्या रुग्णांची राज्यातील संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पण याचाच परिणाम की उद्योग धंदे बंद असल्यानं संपूर्ण राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे. राज्याच्या तिजोरीवर अशा काळात अधिक ताण येत असतो. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक आर्थिक मदत घेऊन पुढे सरसावले आहेत. त्यातच शिर्डी देवस्थाननेही ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे.


अनेक संस्थांचा पुढाकार

कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यापासून, अनेक नामांकित संस्था आणि व्यक्ती पुढाकार घेऊन राज्य सरकारला मदत करत आहेत.

गुरुवारी सीआरपीएफनं पंतप्रधानांच्या मदतनिधीत ३३.८१ कोटींची देणगी दिली. त्यानंतर राजकीय पार्ट्यांनी देखील एकमतानं कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील महावीर मंदिर ट्रस्टनं मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी रुपयांची देणगीही दिली.


'यांनी'ही केली मदत

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी कोरोनव्हायरस विरूद्ध देशाच्या लढाईसाठी १०० कोटी रुपयांची देणगी दिली. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स समुहानं मुंबईत कोविड -१९च्या रुग्णांसाठी रुग्णालय उघडण्या व्यतिरिक्त अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. महिंद्रा समूहानं आपले रिसॉर्ट्स कोविड -१९ रुग्णांसाठीच्या केअर सेंटरमध्ये रूपांतरित करण्याची ऑफर दिली आहे. लॉकडाऊन कालावधीत पार्ले कंपनी गरजूंसाठी ३ कोटीची पार्ले-जी बिस्किटांचं वाटप करणार आहे.

याशिवाय सचिन तेंडुलकर, पी व्ही सिंधू, हिमा दास, बजरंग पुनिया आणि सानिया मिर्झा यासारख्या अनेक खेळाडूंनीही कोविड -१९वर विजय मिळवण्यासाठी देणगीचा वाटा उचलला आहे.हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प

Coronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात

संबंधित विषय