• परळमध्ये मंडईच्या पुनर्विकासासाठी ठिय्या आंदोलन
  • परळमध्ये मंडईच्या पुनर्विकासासाठी ठिय्या आंदोलन
  • परळमध्ये मंडईच्या पुनर्विकासासाठी ठिय्या आंदोलन
SHARE

परळ - महानगरपालिकेच्या डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या 20 महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे येथील गाळेधारकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने 30 जानेवारीला मंडई व्यापारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली 143 गाळेधारकांनी एक दिवसीय शांतता ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतरही पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर, 1 मार्चपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा गाळेधारकांनी दिला.

परळ (पू.) येथील महानगरपालिकेच्या डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर मंडई पुनर्विकासाच्या नावाखाली महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी येथील गाळेधारकांना खाली करण्यास सांगितले. त्यानंतर पुनर्बांधणीसाठी ती मंडई तोडण्यात आली. मात्र 20 महिने उलटून गेल्यानंतरही मंडईच्या विकासासाठीचं कोणतेही काम पालिकेने हाती घेतलं नसल्याने गाळेधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आमदार अजय चौधरींनी आंदोलकांची भेट घेत 'गाळेधारकांनी अनधिकृतपणे याच जागेत व्यवसाय करावा यासाठी पाठिंबा देणार असल्याचं तोंडी आश्वासन त्यांनी दिलं. पालिकेच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले आहे, मात्र येत्या एप्रिल ते मे 2017 पर्यंत मंडईचा पुनर्विकास होईल असंही आमदार चौधरी म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या