Advertisement

'जकात नाक्याच्या जागी रुग्णालय बांधा'

मुंबईच्या हद्दीत प्रवेश करताना वाशी, मुलुंड, दहिसर या ठिकाणी जकात नाके लागतात. जीएसटी लागू झाल्यापासून या जागा वापराविना पडून आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या जागेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं रुग्णालय सुरु करण्यात यावं, अशी मागणी शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. मोक्याच्या जागी रुग्णालय उभारल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला तसंच उपनगरातील जनतेला या आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

'जकात नाक्याच्या जागी रुग्णालय बांधा'
SHARES

मुंबईतील जकात नाके बंद झाल्याने पडून असलेल्या या जागेचा वापर कोस्टल रोडच्या कास्टींग यार्डासाठी महापालिका करणार आहे. सत्ताधारी शिवसेनेचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. तरीही शिवसेनेच्याच एका नगरसेविकेने जकात नाक्यांच्या मोकळ्या भूखंडावर सुसज्ज रुग्णालय बांधण्याची मागणी केली आहे. एकाबाजूला कोस्टल रोड सल्लगार सेवा प्रस्तावाच्या मंजुरीवरून रान उठलेलं असताना शिवसेना नगरसेविकेने केलेल्या मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

कुठे आहेत जकात नाके?

मुंबईच्या हद्दीत प्रवेश करताना वाशी, मुलुंड, दहिसर या ठिकाणी जकात नाके लागतात. जीएसटी लागू झाल्यापासून या जागा वापराविना पडून आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या जागेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं रुग्णालय सुरु करण्यात यावं, अशी मागणी शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. मोक्याच्या जागी रुग्णालय उभारल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला तसंच उपनगरातील जनतेला या आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बस टर्मिनलसाठीही मागणी

जकात नाक्यांच्या जागा खासगी बस उभ्या करण्यासाठी देण्यात याव्यात अशी मागणी खासगी बस वाहतूक संघटनेकडून होत आहे. त्यातच भाजपाचे मुलुंडमधील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आरटीओ ऑफीसला ही जागा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर याठिकाणी उद्यान बनवण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्याच नगरसेवकांकडून यापूर्वी करण्यात आली होती. हे सर्व भूखंड सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षित भिंत बांधण्याकरता कंत्राटदाराच्या नेमणुकीचा प्रस्ताव होता. परंतु हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे.

कास्टींग यार्डसाठीच

जकात नाक्यांच्या सर्व जागा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांच्या कास्टींग यार्डसाठी वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या जागेवरील खर्चाचे सर्व प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतले असून या जागेचा वापर कास्टींग यार्डसाठीच केला जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा-

जकात नाक्यांच्या जागांवर ‘कोस्टल रोड’चं कास्टिंग यार्ड

जकात नाके बंद होण्यापूर्वी क्रिस्टलच्या तिजोरीत पावणे तीन कोटी ओतले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा