Advertisement

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला टाळं, पत्रकार परिषद घेण्यापासून मनसेला रोखलं

पत्रकार परिषदेसाठी देशपांडे आपल्या सहकाऱ्यांसह महापालिका मुख्यालयात आले खरे; पण त्यांना दिसलं ते पत्रकार कक्षाला लावलेलं टाळं. हे टाळं महापालिका प्रशासनाने लावलं होतं. यावरून महापालिका मुख्यालयात चांगलाच राडा झाला.

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला टाळं, पत्रकार परिषद घेण्यापासून मनसेला रोखलं
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात दुपारी एका आरक्षित भूखंडाबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यानुसार या पत्रकार परिषदेसाठी देशपांडे आपल्या सहकाऱ्यांसह महापालिका मुख्यालयात आले खरे; पण त्यांना दिसलं ते पत्रकार कक्षाला लावलेलं टाळं. हे टाळं महापालिका प्रशासनाने लावलं होतं. यावरून महापालिका मुख्यालयात चांगलाच राडा झाला. जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अखेर त्यांनी हे टाळं काढलं आणि मनसेची पत्रकार परिषद झाली. यामागं शिवसेनेचा हात असून त्यांच्याच दबावाला बळी पडत पत्रकार परिषद घेण्यापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती देशपांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.




महापौर बंगल्यासाठी नवी जागा?

दादर शिवाजी पार्क जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्याचा विचार सुरू आहे. जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्यात मनसेनं विरोध दर्शवला असून बंगल्याची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. जिमखाना आणि आसपासच्या परिसरात हजारो नागरिक-तरूण, लहान मुलं व्यायामासाठी तसंच मैदानी खेळ खेळण्यासाठी येतात. अशावेळी ही जागा हडपण्याचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे.

याच विषयावर गुरूवारची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेची माहिती मिळताच पत्रकार कक्षाला टाळं लावत जनसंपर्क विभागानं टाळं लावलं आणि मनसेला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं, असा आरोप देशपांडे यांनी केला.


रोखण्याचा प्रयत्न का?

मनसेकडे पत्रकार परिषद घेण्यासाठी परवनागी नसल्याचं जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळं देशपांडे आणि मनसैनिकांनी थेट मुख्य जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कार्यालयात धडक देत त्यांना जाब विचारला. मनसैनिकांनी इथं बराच राडा घातला, सरतेशेवटी या पत्रकार परिषद घेण्यास परवनगी देत पत्रकार कक्षाचं टाळं उघडलं.


शिवसेना घाबरली

दरम्यान शिवसेनेनं आतापर्यंत इतरांच्या बऱ्याच पत्रकार परिषदा उधळवून लावल्या. तर स्वत: च्या पत्रकार परिषदा गाजवल्या. पण आता हिच शिवसेना मनसेच्या पत्रकार परिषदेला किती आणि कशी घाबरतेय ते आज दिसून आल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली आहे. तर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सांगण्यानुसारच जनसंपर्क विभागानं टाळ लावल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

मुंबई बंद करून दाखवावीच-मनसेचं निरुपम यांना आव्हान

लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला भर पत्रकार परिषदेत मनसेकडून चोप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा