Advertisement

‘मेट्रो’चे काम शिवसेनेच्या डोळ्यात खुपतेय का?


‘मेट्रो’चे काम शिवसेनेच्या डोळ्यात खुपतेय का?
SHARES

मुंबईत 15 मे नंतर कोणत्याही कंपन्यांना आणि प्राधिकरणांना रस्त्यांवर खोदकामांना परवानगी दिली जात नाही. तरीही मुंबईत मेट्रो रेल्वेचे खोदकाम सुरुच असून या खोदकामामुळे पावसात पाणी तुंबून अपघात होण्याची भीती लक्षात घेता मेट्रोच्या खोदकामाला त्वरीत बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावरुन शिवेसेनेला मेट्रोचे काम खुपते आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

...तर प्रशासन जबाबदार

मेट्रो रेल्वेच्या अनेक टप्प्यांची कामे सध्या मुंबईत सुरू आहेत. रस्त्यांच्या बाजूला या प्रकल्पासाठी मोठमोठे खड्डे खणण्यात येत आहेत. हे खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यातही सुरुच आहे. त्यामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिक किंवा वाहन पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर अशाप्रकारे काही दुघर्टना घडल्यास याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दिला आहे.



तरीही मुंबईत खोदकामे कशी?

मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे खोदण्यास परवानगी दिली जात नाही. महापालिका आयुक्तांचे तशा प्रकारचे परिपत्रक आहे. तरीही मेट्रो प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांवर खोदकामे केली जात आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वांना समान न्याय असावा. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र देऊन पावसाळ्यात सुरू असलेली मेट्रोची खोदकामे त्वरीत थांबवण्याची मागणी आपण केल्याचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने मेट्रोवर बोलू नये - भाजपा

मेट्रो प्रकल्पाचे काम हे आधीपासून सुरू असून ज्याठिकाणी हे काम सुरू आहे, त्याठिकाणी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल अशा प्रकारे सेवा सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तशा प्रकारची काळजी तिथे घेतली जाईल. मुंबईत आजही हिंदमाता, परळमध्ये पाणी तुंबते. याठिकाणी मेट्रोचे काम सुरु नाही. पाणी तुंबण्याची ठिकाणे ही जुनीच असून शिवसेनेने साफ न झालेल्या नाल्यांच्या आणि बोगस पंपिंग स्टेशनच्या बाबतीत सांगावे, असा चिमटा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी काढला.



हे देखील वाचा - 

पावसाळ्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी नाही - यूपीएस मदान

मेट्रो-3 चे 10 टक्के काम पूर्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा