Advertisement

शिवशाहीमध्ये दिव्यांग प्रवाशांना मिळणार सवलत

शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे.

शिवशाहीमध्ये दिव्यांग प्रवाशांना मिळणार सवलत
SHARES

एसटी महामंडळाच्या वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या  प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील २ लाख ८२ हजार लाभार्थींना त्याचा लाभ होणार आहे.


दिव्यांग व्यक्तींसाठी खुशखबर

अल्पवधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाही बसला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. मात्र नागरिकांची मते जाणून घेत ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली. दृष्टीहिन आणि दिव्यागांनाही अशी सवलत देणं अत्यावश्यक असतं.

मात्र तिकिटांचे दर परवडत नसल्यानं दृष्टीहिन, दिव्यागांनी राज्यपाल के. विद्यासागर राव यांची भेट घेऊन घेतली आणि त्यांना तिकिटांच्या दरात सवलत मिळावी अशी विनंती केली होती. त्यानुसार दृष्टीहिन, दिव्यागांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडं सवलत देण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतल्याची माहिती मंत्री दिवकर रावते यांनी दिली


२ लाख ८२ हजार दिव्यागांना लाभ

शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. महामंडळामार्फत दृष्टीहिन आणि दिव्यागांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येतो. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकुलित शिवशाही बसचाही समावेश करण्यात आला आहे.

सध्या एसटी महामंडळाच्या दृष्टीहिन आणि दिव्यागांना असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्यानं राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असं रावते यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुंबई विमानतळ तीन दिवस सहा तासांसाठी बंद

ओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा