Advertisement

सायन रुग्णालय पुनर्विकासाच्या प्रस्तावात तांत्रिक उणिवा, स्थायी समितीचा दावा

सायन येथील लोकमान्य टिळक पालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम करण्यात येणार आहे.

सायन रुग्णालय पुनर्विकासाच्या प्रस्तावात तांत्रिक उणिवा, स्थायी समितीचा दावा
SHARES

सायन येथील लोकमान्य टिळक पालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. परंतु, सायन रुग्णालय पुनर्विकासाच्या प्रस्तावात तांत्रिक उणिवा असल्याचा दावा करत हा प्रस्ताव स्थायी समितीनं प्रशासनाकडं परत पाठवला आहे. मंगळवारी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

६७२.५५ कोटी खर्च

सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी सुमारे ६७२.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रुग्णालयाच्या पुनर्विकासात ३ इमारती बांधल्या जाणार आहेत. नर्सिंग कॉलेज, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत आणि निवासी डॉक्टरांसाठीच्या इमारतींचा यामध्ये समावेश आहे.

कंत्राट दर कमी

अहलुवालिया कॅान्ट्रक्ट (इंडिया) या कंपनीला हे काम देण्यात आलं असून, कंपनीनं पालिकेने अंदाजित खर्चापेक्षा १० टक्के जादा दरानं हे काम मिळवलं आहे. मात्र, यासाठी विरोधीपक्षानं हरकत घेतली आहे. पालिकेनं कंत्राटदारासोबत आणखी वाटाघाटी करून कंत्राट दर कमी करावेत, अशी सूचना नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. त्यानंतर हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.


हेही वाचा -

पावसाचं पाणी साठवण्यासाठी महापालिका करणार भूमिगत जलबोगदे

ग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंदRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा