Advertisement

वाढलेल्या गवतामुळं शिवाजी पार्कात सापांचा वावर

मैदानातील गवतात सापांचा वावर होत असल्याचं समजताच शिवाजी पार्क नजीकच्या परिसरात राहणाऱ्या व तिथं येणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वाढलेल्या गवतामुळं शिवाजी पार्कात सापांचा वावर
SHARES

मुंबईच्या दादर (dadar) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) (shivaji park) साप आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या पावसाच्या दिवस असून, शिवाजी पार्क मैदानात पावसाळ्यात (mumbai rains) ६ ते ७ फूटांपेक्षा अधिक गवत वाढलं आहे. या वाढलेल्या गवतात सापांचा (snake) वावर असल्याचं बोललं जात होतं. या प्रकरणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पालिका प्रशासनाकडं (bmc) तक्रारही दाखल केली आहे.

शिवाजी पार्क मैदानात सतत क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसंच, लहान मूलंही क्रिकेट व फुटबॉलच्या सरावासाठी मैदानात येत असतात. त्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मैदानातील गवतात सापांचा वावर होत असल्याचं समजताच शिवाजी पार्क नजीकच्या परिसरात राहणाऱ्या व तिथं येणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत खेळाडूंसह अनेक नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई (mns leader nitin sardesai) यांनी शिवाजी पार्कात धाव घेतली.


याबाबत तक्रार दाखल केली असता, महापालिकेच्या कामगारांनी गुरुवारी सकाळी तातडीनं गवत कापण्यास सुरुवात केली. त्यामुळं खेळाडूंसह रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

हवामानातील बदलामुळं संसर्गजन्य आजारात वाढ

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा