Advertisement

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा पुरवली.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
SHARES

कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ कामानिमित्त घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (essential workers) वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा पुरवली. परंतू, या कोरोनानं एसटी (msrtc) कर्मचाऱ्यांना चांगलंच टार्गेट केलं आहे. त्याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, मुंबईकरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी गाव सोडून आलेल्या ४०० एसटी चालकांना शहरात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या २ वेळेचं जेवण, रात्री विश्रांतीची व्यवस्था एसटी महामंडळानं केलेली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांना रस्त्यांवर रात्र काढावी लागली. मागणीनुसार सातारा-सांगली विभागातून गाड्या घेऊन ४०० कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांना सुरुवातीला एसटी मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल इथं बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था सांताक्रूझ, वांद्रे परिसरात केल्याचं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात तिथं गेल्यावर राहण्याची आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने मंगळवार-बुधवारची रात्र रस्त्यावर काढावी लागली व करोनासंसर्गाची भीती असताना उघड्यावरील अन्न खावे लागल्याची माहिती मिळते.

पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली या विभागांतून प्रत्येकी १०० बस मुंबई दाखल झाल्या आहेत. रायगड, नाशिक या विभागांतून अतिरिक्त गाड्या बेस्टच्या मार्गावर धावत आहेत. गाड्यांसह चालक, वाहक, मॅकेनिक असे कर्मचारी मुंबईत दाखल झाले. १६ ऑक्टोबरपर्यंत एक हजार गाड्यांची मागणी बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाकडे केलेली आहे. सध्या ७०० गाड्या धावत असून, उर्वरित ३०० गाड्या बाकी आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस, कर्मचाऱ्यांची गैरसोय आणि कोरोना संसर्गाची भीती यांमुळं ३०० गाड्या मुंबईत दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा - 

मुंबईत 'या' तारखेपासून धावणार मेट्रो

मेट्रोसोबत मोनोरेल ही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा