Advertisement

कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्या

मुंबईत दोन ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात ८ जणांचा मृत्यू झालेला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्या
SHARES

मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत गुरूवारी शहरात कुलाबा येथे १८.८ मीमी पाऊस तर सांताक्रूझमध्ये १२९.४ मीमी पावसाची नोंद ही सायंकाळी ५.३० पर्यंत करण्यात आली आहे. तर दिवसभरात मुंबईत ठिक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर मुंबईत दोन ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात ८ जणांचा मृत्यू झालेला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

मुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुरूवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात  हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नं २४ , गांधी मार्केट,  सायन रोड नं १४ रुईया काँलेज, एसआयईएस काँलेज, समाज मंदीर हाँल, प्रतिक्षानगर या ठिकाणी पाणी साचले. तर पश्चिम उपनगरात अंधेरी सब वे, खार लिंक रोड,नॅशनल काँलेज वांद्रे, वीरा देसाई रोड या ठिकाणी पाणी साचले होते. तर पूर्व उपनगरात शितल सिनेमा बैलबाजार, टेंबी ब्रीज, चेंबूर, पोस्टल काँलनी चेंबूर  या ठिकाणी पाणी साचले होते. त्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्तीने पाण्याचा निचरा केला.

हेही वाचाः- म्हणून सोनू सूदचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार

तर गुरूवारी पडलेल्या पावसात शहरात दोन ठिकाणी घरे आणि इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या, मालाडच्या मालवणी परिसरात तळमजला अधिक दोन मजले असे राहते घर कोसळले. या दुर्घटनेच १५ जण जखमी झाले. तर दोघांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे सायंकाळी ४.४३ वा. मिंट रोड, जीपीओजवळच्या भानूशाली या तळमजला अधिक ६ अशा इमारतीचा उत्तरेकडील  भाग कोसळला. ही इमारत म्हाडाची उपकर प्राप्त इमारत असल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. कुसूम गुप्ता, ज्योत्सना गुप्ता, पदमल गुप्ता, किरण मिश्रा, मनीबेन फारिया आणि एक अज्ञात महिला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच

त्याच बरोबर  गुरूवारी शहरात ११ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात शहरात २, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ८ झाडं पडल्याची अशी एकून ११ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पावळ्यात शहरात अनेक ठिकाणा शाँर्ट सर्किटच्या ही घटना घडत असतात, गुरूवारी मुंबईत ७ ठिकाणी शाँर्ट सक्रिटच्या घटना घडल्या असून त्यात शहरात ४, पश्चिम उपनगरात ३ घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच वांद्रे येथील भारत नगरच्या नाल्यात ५ मुले पोहायला उतरली होती. मुसळधार पावसात नाल्याचा प्रवाह वाढल्याने ही मुले बुडू लागली. त्यावेळी ४ जणांचा वाचवण्यात यश आले. मात्र आशिष नावाचा १६ वर्षीय मुलाचा सायंकाळी उशिरपर्यंत शोध लागलेला नव्हता. त्याचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मार्फत सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा