Advertisement

दादर, माहिममधील 'या' इमारती अतिधोकादायक घोषित


दादर, माहिममधील 'या' इमारती अतिधोकादायक घोषित
SHARES

मुंबईतल्या दादर आणि माहिममधील महापालिकेच्या जी/ उत्तर विभागातील ‘सी -१’ वर्गवारीतील खासगी आणि महापालिकेच्या इमारती या धोकादायक असल्याचं घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७ खासगी आणि ३ महापालिकेच्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांनी या इमारती रिकाम्या कराव्यात असं आवाहन महापालिकेने केलं आहे. जर, या इमारती रहिवाशांनी रिकाम्या न केल्यास त्यांची वीज आणि पाणी तोडण्यात येईल,असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.


धोकादायक खासगी इमारती

  • अमृत महोत्सव वास्तू बिल्डिंग, एन.सी.केळकर रोड. दादर (पश्चिम)
  • गिरी कुंज बिल्डिंग, एल. जे. रोड, माहिम
  • ३०, रेल व्ह्यूव बिल्डिंग, सेनापती बापट रोड, माहिम
  • बुऱ्हानी मंजिल, बोरी चाळ, वांजेवाडी, माहिम
  • खांडके बिल्डिंग, क्र .७ आणि ८, आर.के.वैद्य मार्ग, दादर (पश्चिम)
  • मंगेश भूवन सी.एच.एस.लि., डि. एल. वैद्य रोड, दादर (पश्चिम)
  • कलकत्ता कन्फेक्शनरी अँड शितला देवी इंडस्ट्रियल इस्टेट, शितलादेवी मंदिर


महापालिका वसाहत

  • राऊतवाडी बिल्डिंग, जे.के.सावंत मार्ग, दादर (पश्चिम)
  • गोपीटॅक ट्रांझिस्ट कॅम्प, माहिम डिव्हीजन, सिटीलाईट सिनेमा जवळ, माहिम
  • बंबुट चाळ, भाईदंरकर मार्ग, दादर

हेही वाचा - 

मुंबईतल्या ७ उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक, रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवणार

बीडीडी वरळीचा पुनर्विकास टाटाच्या हाती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा