Advertisement

जोकिन यांच्या स्पार्कला पालिकेचा शॉक


जोकिन यांच्या स्पार्कला पालिकेचा शॉक
SHARES

मुंबई - मॅगसेसे पुरस्कार विजेते जोकिन यांच्या स्पार्क या स्वयंसेवी संस्थेला मुंबई महानगरपालिकेनं शॉक दिलाय. जोकीन यांच्या स्पार्क संस्थेसह कंत्राटदार स्पार्क समुदाय निर्माण सहाय्यक संस्थेसही पालिकेनं काळ्या यादीत टाकलंय. याशिवाय स्पार्क समुदाय निर्माण सहायक संस्थेला 24 लाखांचा दंड ठोठावताना 26 लाखांची अनामत रक्कम जप्तही केलीये.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रम खात्याकडे मे. स्पार्क संस्थेला काळ्या यादीत टाकल्याबद्दलची माहिती विचारली होती. त्यावर पालिकेनं 26 फेब्रुवारी 2016 ला स्पार्कला पत्र पाठवून काळ्या यादीत टाकल्याचं कळवलं. तसंच स्पार्क समुदाय निर्माण सहायक संस्थेचं कंत्राट रद्द करत पुढील पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकल्याचीही माहिती दिलीय.
कामाची गुणवत्ता न राखल्यानं, शौचालयांची दुरुस्ती न केल्यानं, अकार्यक्षमता दाखवल्यानं ही कारवाई करण्यात आलीये. 42 महिन्यांच्या कंत्राटाच्या कालावधीत 66 पैकी 37 कामं करण्यास स्पार्कनं नकार दिला. तर 29 पैकी केवळ 20 कामं पूर्ण केली असून 8 कामं अपूर्ण आहे. तर एक काम अजूनही सुरूच झालेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा