पीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सीला दणका, कारवाईवरील स्थगिती अर्ज फेटाळला

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांना फसवून भारताबाहेर पळ काढलेला आरोप ​मेहुल चोक्सी​​​ याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यास आता कुठलीही आडकाठी राहिलेली नाही.

SHARE

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांना फसवून भारताबाहेर पळ काढलेला आरोप मेहुल चोक्सी याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यास आता कुठलीही आडकाठी राहिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय देत चोक्सीला दणका दिला आहे.

विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात मेहुल चोक्सीविरोधात खटला सुरू आहे. न्यायालयाने वारंवार समन्स आणि वाॅरंट बजावूनही चोक्सी न्यायालयापुढं आलेला नाही. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात यावं यासाठी ‘ईडी’ने न्यायालयात अर्ज केला आहे. 

हेही वाचा- कुर्ल्यात ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

त्याला विरोध करत ईडीने प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहितीच्या आधारे कनिष्ठ न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. ज्या माहितीच्या आधारे ‘ईडी’ने अर्ज केला आहे, त्याविरोधात स्वत:चे साक्षीदार उभे करण्याची किंवा ‘ईडी’च्या संबंधित अधिकाऱ्यांची उलटतपासणी करण्याची आरोपीला संधी मिळायला हवी. त्यामुळे न्यायालयातील या प्रक्रियेला स्थगिती मिळावी, अशी मागणी चोक्सीच्या वकिलांकडून करण्यात आली होती. 

हेही वाचा-PMC घोटाळा : आणखी तिघांना अटक

त्यावर निर्णय देताना न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने मेहुल चोक्सीचा अर्ज फेटाळून लावत ही कायदेशीर कारवाई थांबवणं योग्य होणार नाही, असं स्पष्ट केलं. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या