Advertisement

पर्यावरण जनजागृतीत बोरीवलीतील विद्यार्थी 'रॉक्स'


SHARES

मुंबईत विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या बांधकामांमुळे प्रदूषणाची पातळीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी बोरीवली, गोराईतील सेंट रॉक्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर रॅली काढली.



या रॅलीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश दिला. या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात रॅली काढण्यात आली.



रॅलीसाठी विद्यार्थ्यांनी एक देखावा देखील साकारला होता. त्यात पृथ्वी, झाडे यांच्या प्रतिकृती बनविल्या होत्या. विशेष म्हणजे या सर्व प्रतिकृती टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आल्या होत्या. रॅलीतील आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या कापडी पिशव्यांचे
रहिवाशांमध्ये वाटप करत त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांच वापर टाळण्याचे आवाहन केले.



या रॅलीतून पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्येही सजगता निर्माण झाली. यापुढेही आम्ही असे उपक्रम राबवू, असे शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी भार्गव यांनी सांगितले.



हे देखील वाचा -

 अारेत ७ दिवसांत 'त्यांनी' लावली १४०० झाडे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा