Advertisement

मुद्रांक कार्यालये सातही दिवस रात्री पावणे नऊपर्यंत खुली

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. अनेक घरं विक्रीसाठी पडून राहिली आहेत. त्यामुळे राज्यसरकारने अडचणीत आलेल्या बांधकाम उद्योगाला संजीवनी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात केली आहे.

मुद्रांक कार्यालये सातही दिवस रात्री पावणे नऊपर्यंत खुली
SHARES

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. अनेक घरं विक्रीसाठी पडून राहिली आहेत. त्यामुळे राज्यसरकारने अडचणीत आलेल्या बांधकाम उद्योगाला संजीवनी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घर खरेदीसाठी प्रतिसाद मिळू लागला. आता मुद्रांक नोंदणी कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सातही दिवस रात्री ८.४५ पर्यंत खुली राहणार आहेत.

राज्य मत्रिमंडळाने २६ ऑगस्टला मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३ टक्क्यांनी, तर १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी २ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ५ टक्क्यांवरून २ टक्के तर शहरी भागात ६ टक्क्यांवरून ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारलं जात आहे.

मुद्रांक शुल्क कमी केल्याने घर खरेदी वाढली आहे. पूर्वी दिवसाला राज्यात पाच-सहा हजारच्या आसपास घर खरेदी व्यवहारांची नोंदणी होत होती. आता रोज १२ ते १३ हजार नोंदणी होत आहे. मागील तीन महिन्यांत एक लाखांच्या पुढे घर खरेदी-विक्रीच्या दस्तावेजांची नोंदणी झाली आहे.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा