Advertisement

मुलुंड फार्मसी कौन्सिल कार्यालयात नोंदणीदरम्यान चेंगराचेंगरी

शुक्रवारी सकाळी फार्मसी नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी मुलुंड येथील महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या कार्यालयात मोठी गर्दी केली. एकाचवेळी 1000 हुन अधिक विद्यार्थी इथं आले आणि ही गर्दी आवरण्यात कौन्सिल अपयशी ठरले. त्यामुळे इथं चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळ उडाला नि यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या विद्यार्थ्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

मुलुंड फार्मसी कौन्सिल कार्यालयात नोंदणीदरम्यान चेंगराचेंगरी
SHARES

फार्मसी नोंदणीसाठी मुंबईसह राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना मुलुंड येथील महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या कार्यालयात यावं लागतं. त्यानुसार शुक्रवारी सकाळी फार्मसी नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी कार्यालयात मोठी गर्दी केली. एकाचवेळी 1000 हुन अधिक विद्यार्थी इथं आले आणि ही गर्दी आवरण्यात कौन्सिल अपयशी ठरले. त्यामुळे इथं चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळ उडाला नि यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या विद्यार्थ्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


कौन्सिल कार्यालय एकच

डी फार्म, बी फार्म आणि एम फार्म झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे नोकरी वा औषध क्षेत्रात व्यवसाय, औषध दुकान चालवण्यासाठी कौन्सिलकडे नोंदणी आणि नोंदणीचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. संपूर्ण राज्यभरातील फार्मसी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत एकच असं कौन्सिलचं कार्यालय आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थ्यांना मुलुंड इथं यावं लागतं. गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतो. त्यांना नोंदणीसाठी सतत फेऱ्या माराव्या लागतात.


चेंगराचेंगरीचा दुर्दैवी प्रकार

विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेत आता कौन्सिलनं ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 7 ऑगस्ट पासून या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार आहे. या प्रकियेमुळ आता विद्यार्थ्यांना केवळ एक दिवस कागदपत्र पडताळणीसाठीच यावं लागणार आहे. यानुसार कौन्सिलने वर्तमानपत्रातून तशी सूचनाही दिली आहे. आता ऑनलाईन नोंदणी सुरू होण्यासाठी केवळ 4 दिवस बाकी असताना असा चेंगराचेंगरीचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.


नि चेंगराचेंगरी झाली

ऑनलाईन नोंदणी ही आपली सुविधा असताना याच बाबीकडे दुर्लक्ष करत, आता नोंदणी वेगळ्या पद्धतीनं होण्याआधी नोंदणी करून घ्यावी या विचारानं शुक्रवारी 1000 हुन अधिक विद्यार्थी मुंबईच्या कौन्सिल कार्यालयात धडकले. रोज 100 ते 150 विद्यार्थी येथे येत असताना थेट 1000 हुन अधिक विद्यार्थी आले नि चेंगराचेंगरी झाली. यात एक विद्यार्थी गंंभीर जखमी झाला.


नोंदणीची प्रक्रिया करणार पूर्ण

विद्यार्थ्यांना उलट आम्ही चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यांना एकच दिवस यावं लागणार असताना विद्यार्थ्यांनी गर्दी का केली हेच समजत नसल्याचं सांगत पाटील यांनी विद्यार्थ्यांना घाई न करण्याचं आणि ऑनलाईन नोंदणी करण्याचं अवाहन केलं आहे.

सध्या जे विद्यार्थी कौन्सिलमध्ये आले आहेत त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचा निर्णय कौन्सिलनं घेतला आहे. कारण ही मुलं दुरून, गावागावातून आले आहेत. त्यांची मुंबईत राहण्याची सोय नाही. त्यांचा तिकिटाचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे. त्यानुसार गर्दी आवरत कौन्सिलने कार्यालयात अर्धे आणि खाली व्हरांड्यात अर्धे विद्यार्थी अशी नोंदणी सुरू केली आहे.


हेही वाचा - 

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

शिक्षक व्हायचंय... ? मग 'ही' बातमी नक्की वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा