Advertisement

महापालिकेची ‘त्या’ गोदामातील जुनी कागदपत्रे खराब


महापालिकेची ‘त्या’ गोदामातील जुनी कागदपत्रे खराब
SHARES

महापे येथील स्टोअरमध्ये लागलेल्या आगीत महापालिकेच्या कागदपत्रांच्या बऱ्याच फाइल्स खराब झाल्याची कबुली आता महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मेटल कंटेनर्समध्ये जतन करण्यात आलेल्या महापालिकेच्या कागदपत्रांच्या फाईल्स सुरक्षित आहेत. परंतु आग विझवताना पाण्यामुळे व बेसमेंटच्या उष्णतेमुळे काही कागदपत्रे खराब होण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे झालेलं नुकसान तपासण्याची कार्यवाही चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


फाइल्स आगीत जळाल्या?

मुंबई महापालिकेने स्टॉक होल्डिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडे जतन करण्यासाठी दिलेल्या महत्वाच्या नस्ती तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून नष्ट झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत केला होता. या आगीत १८ हजार नस्ती (फाइल्स) नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या फाइल्स सुरक्षित आहेत की खराब झाल्यात आहे, अशी माहिती त्यांनी मागवली होती.


रजिस्टर जतन

महापालिकेच्या सार्वजनिक कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करून फिजिकल स्वरुपात जतन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक व स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीने महापे येथील गोदामामध्ये पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये विकास नियोजन विभागाच्या १८०९६ फाइल्स आणि प्रमुख लेखापाल (कोषागार) विभागाच्या ११०० रजिस्टर जतन करण्यात आलेले आहेत.

याबाबत संबंधित कंपनीकडे विचारणा केली असता महापे येथील फॅसिलिटी स्टोअरमध्ये मेटल कंटेनर्स रोबोटी बे- १,२,३ आणि प्रोसेसिंग एरिया बे-४ मध्ये जतन केलेलं आहे. परंतु आग विझवताना पाण्यामुळे व बेसमेंटच्या उष्णतेमुळे काही अभिलेख खराब झालेले असण्याची शक्यता आहे. झालेलं नुकसान तपासण्याची कार्यवाही चालू असून याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर कळविण्यात येईल, असं उत्तर संबंधित कंपनीने दिल्याचं अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी दिलं.



हेही वाचा-

शैक्षणिक संस्थांची मालमत्ता करातील सवलत रद्द!

आता मलवाहिन्यांच्या मॅनहोल्सवरही बसवणार जाळ्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा