Advertisement

कटू अनुभव सुखद ठरला! मुसळधार पावसात फ्रेंच कुटुंबाला गुरूद्वाराने दिला आसरा


कटू अनुभव सुखद ठरला! मुसळधार पावसात फ्रेंच कुटुंबाला गुरूद्वाराने दिला आसरा
SHARES

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणेच शहरात पर्यटनासाठी आलेले परदेशी नागरीकही अडकले होते. फ्रान्सहून आलेल्या एका कुटुंबाचाही त्यात समावेश होता. भर पावसात दादरमध्ये हे कुटुंब अडकलेले असताना श्री गुरू सिंह सभा गुरूद्वारातील कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. या कार्यकर्त्यांनी त्यांना गुरूद्वारात आश्रय देण्यासोबत त्यांची योग्य काळजीही घेतली. यामुळे भारावून गेलेल्या या कुटुंबाने पाऊस थांबल्यानंतर कार्यकर्त्यांचा निरोप घेताना गुरूद्वारातील 'स्मरण पुस्तिके'त मुंबईतील कटू अनुभव सुखद ठरल्याचे लिहित सर्वांचे आभार मानले.



मंगळवारच्या जलप्रकोपाने मुंबईला अक्षरश: ठप्प करून टाकले. सर्वसामान्य असो किंवा खास व्यक्ती सर्वांनाच पावसाने एका पातळीवर आणून ठेवले. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुंबईकरांना स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटना, धार्मिक संस्था आपापल्या परीने मदत करत होते.

त्यातच फ्रान्सहून भारतात पर्यटनासाठी आलेल्या फ्रेंच कुटुंबालाही या पावसाचा फटका बसला. अॅरी आणि सोफी बोलेस्वास्की हे दांम्पत्य आपल्या तीन मुलींसहित उदयपूरहून औरंगाबाद आणि तेथून पुढे मुंबईत आले होते. जोरदार पावसाला सुरूवात होताच ते राहण्यासाठी हॉटेल शोधू लागले. पण त्यांनाच कुठेच रूम मिळाला नाही. अखेर एका हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याने गुरूद्वारा कमिटीच्या कार्यकर्त्याकडे बोट दाखवून त्याच्याकडे जाण्यास त्यांना सांगितले.

त्यानुसार हे कुटुंब या कार्यकर्त्यांकडे जाताच गुरूद्वाराच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुखरूप श्री गुरू सिंह सभा गुरूद्वारात आणले. येथे आधीच ७५० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फ्रेंच कुटुंबाला एक लहान खोली देण्यात आली. गुरूद्वारीतील लंगरमध्ये त्यांनी सर्वांसोबत खिचडीही खाल्ली.

बुधवारी सकाळी रस्ते वाहतूक सुरळीत होताच हे कुटुंब विमानतळावर गेले आणि तेथून पुढे पॅरीसला पोहोचले. पण जाण्याअगोदर अॅरी आणि सोफी बोलेस्वास्की दांम्पत्याने रूद्वारातील 'स्मरण पुस्तिके'त लिहिले की, ''मिट्ट काळोखात एखाद्या प्रकाशस्तंभाप्रमाणे गुरूद्वारा आमच्या मदतीला धावला. येथे आम्हाला केवळ आश्रयच मिळाला नाही, तर दयाभावनेचा सर्वोत्तम अनुभवही घेता आला. धन्यवाद भारत''



हे देखील वाचा -

केईएममध्ये पाण्यात उभं राहून डॉक्टरांनी केले उपचार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा