Advertisement

मुंबईतल्या 'या' परिसरातून ५ अजगरांना वाचविण्यात यश

अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी केली आहे.

मुंबईतल्या 'या' परिसरातून ५ अजगरांना वाचविण्यात यश
SHARES

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा साप मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. मुंबईतील वांद्रे व बोरिवली परिसरात २ दिवसांमध्ये ५ अजगरांना वाचविण्यात यश आले आहे. अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी केली आहे.

गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बोरिवली पश्चिमेच्या चिकूवाडी येथील विट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील मैदानात स्थानिक रहिवाशांना अजगर आढळून आला. यावेळी सर्पमित्र सुनील गुप्ता यांनी या ५ फुटी अजगराची सुखरूप सुटका केली. वांद्रे पश्चिम येथील बांगडीवाला चाळ येथून गुरुवारी सकाळी १०.३० वाजता ७ फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्र यांनी जीवदान दिले.

बोरिवली पूर्वच्या हनुमान मंदिर दौलतनगरच्या मागे असलेल्या चाळीत एका घरात गुरुवारी एक अजगर शिरला होता. यावेळी दुपारी १ वाजता या ७ फूट लांबीच्या अजगराची सर्पमित्र यांनी सुखरूप सुटका केली, तर मंगळवारी दुपारी २ वाजता बोरिवली पश्चिम येथील कोराकेद्रा मैदानात नागरिकांना ५ फुटी अजगर आढळून आला. या अजगराची सर्पमित्र यांनी सुखरूप सुटका केली.

मंगळवारी बोरिवली पूर्व येथील हिंदू स्मशानभूमीजवळील संजयनगर इथं ७ फुटी अजगर नागरिकांना आढळला. या अजगराची संध्याकाळी ५ वाजता सर्पमित्र यांनी सुखरूप सुटका केली. या ५ ही अजगरांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, मानद वन्यजीव वार्डन सुनीश सुब्रमण्यम आणि वन्यजीव कार्यकर्त्या निशा कुंजू यांच्या नेतृत्वात वन विभागाला माहिती देऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.


हेही वाचा-

विधानसभा अध्यक्षपदावर शरद पवार यांचं मोठं विधान

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा