Advertisement

बांधकाम बंदीवरील स्थगितीस २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई महापालिका क्षेत्रातील घनकचरा सुव्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकामांना परवानगी देण्यास २९ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीबाबत एका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

बांधकाम बंदीवरील स्थगितीस २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SHARES

 मुंबईतील नवीन बांधकाम परवानग्यांच्या बंदीवरील स्थगितीस २३ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने विशेष सुनावणीदरम्यान पुढील सुनावणीपर्यंत मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या आहेत.  उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रातील घनकचरा सुव्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकाम परवानग्या देण्यास बंदी घातली होती. त्या पार्श्वभूमीव हे निर्देश दिले आहेत.


सर्वोच्च न्यायालयात याचिका 

मुंबई महापालिका क्षेत्रातील घनकचरा सुव्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकामांना परवानगी देण्यास २९ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. या बंदीबाबत एका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने  १५ मार्च २०१८ रोजी बांधकाम बंदी आदेश ६ महिने उठविण्याचे निर्देश दिले होते. ६ महिन्यांची मुदत १५ सप्टेंबर २०१८ रोजी संपल्यानंतर ही बंदी पुन्हा लागू झाली होती.

सुनावणी २३ ऑक्टोबरला

 बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी घेण्याचे आदेश देतानाच, तोपर्यंत म्हणजेच २३ ऑक्टोबरपर्यंत बांधकाम बंदीवरील स्थगितीला मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.



हेही वाचा - 

मेट्रो-४ पण वादात! कास्टिंग यार्डला पर्यावरणप्रेमींचा विरोध

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी! दूध भेसळखोरांवर कारवाई कधी?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा