Advertisement

कचरा फेकणांऱ्यावर आता ड्रोनची नजर, केडीएमसीचा उपक्रम

पालिका क्षेत्रात आता ड्रोनच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी कचरा करणाऱ्यांवर पाळत ठेवली जाणार आहे. बुधवारी रात्रीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे

कचरा फेकणांऱ्यावर आता ड्रोनची नजर, केडीएमसीचा उपक्रम
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने (केडीएमसी) आता कचरा फेकणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पालिका क्षेत्रात आता  ड्रोनच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी कचरा करणाऱ्यांवर पाळत ठेवली जाणार आहे. बुधवारी रात्रीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे

अनेक नागरिक रात्री कचरा टाकून शहरात अस्वच्छता पसरत असल्याचं आढळून आलं आहे. पालिकेने वारंवार सांगून आणि दंड आकारणीही करून अनेक ठिकाणी कचरा टाकणं सुरूच आहे. त्यामुळे पालिकेने आता ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा टाकण्यात येणारी ठिकाणे ओळखून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने पाळत ठेवली जाणार आहे. 

ओला सुका कचरा वर्गीकरण, कचरा कुंडीमुक्त शहर, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या विरोधात कठोर कारवाई, विविध ठिकाणी मार्शलची नियुक्ती अशा विविध उपाययोजना स्वच्छतेसाठी केडीएमसीने राबवल्या आहेत. मात्र काही बेजबाबदार नागरिकाकडून रात्री अपरात्री उघडयावर कचरा टाकत अस्वच्छतेत भर टाकली जाते. 

अनेकदा ताकीद देऊनही रात्रीच्या सुमारास नजर चुकवून कचरा रस्त्यावर टाकला जातो. अशा नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी केडीएमसीकडून ड्रोन कॅमरेचा वापर केला जाणार आहे. ड्रोन कॅमेरात आलेल्या इमेजच्या आधारे संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे .



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा