Advertisement

रस्त्यावर कचऱ्याचा ढिग अन् म्हणे कचरापेटीमुक्त मुंबई


रस्त्यावर कचऱ्याचा ढिग अन् म्हणे कचरापेटीमुक्त मुंबई
SHARES

मुंबईत सध्या 'स्वच्छता अभियान' राबवले जात आहे. पण ही योजना राबवण्यास महापालिकेचे अधिकारी उदासीन असल्याची टीका स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. महापालिकेने कचरापेटीमुक्त करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या कचरापेट्या हटवल्या आहेत. परंतु घरोघरी जाऊन कचरा उचलण्याच्या मोहिमेला खो बसल्यामुळे लोक रस्त्यावर आणून कचरा फेकत आहेत. त्यामुळे कचरापेट्यामुक्त मुंबई झाली असली तरी प्रत्यक्षात या पेट्याअभावी रस्त्यांवर कचरा दिसून येत असल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली आहे.


'जुन्या पद्धतीनेच सफाई करा'

मुंबईत ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एच-पूर्व, विभागांमध्ये कचरा उचलला जात नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये शुभेच्छांऐवजी नगरसेवकांना शिव्या शाप मिळत होता. अशाप्रकारची तक्रारच शिवसेना नगरसेवक सदा परब यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित केली. भाजपाचे अभिजित सामंत यांनी के-पूर्व विभागातही अशीच परिस्थिती होती, असे स्पष्ट करत यामागचे कारण काय अशी विचारणा केली.

मॅकेनिकल स्विपिंग अर्थात यांत्रिक झाडूने साफसफाई केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात ही वाहनेच दिसत नसल्याची तक्रार भाजपा नगरसेविका अलका केरकर यांनी केला. त्यामुळे ही यांत्रिक सफाई बंद करून जुन्या पद्धतीनेच सफाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.


प्रत्येक रस्त्यावर कचरा

देशात 'स्वच्छ भारत' अभियान राबवले जात आहे. परंतु, मुंबईत अशाप्रकारची स्वच्छता कुठेच दिसत नाही. मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर कचरा दिसून येत आहे. कचरापेट्यामुक्त करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे आता हाच कचरा रस्त्यांवर दिसत असल्याचा आरोप शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी केला. 

दत्तक वस्तीत कमी कामगार असले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. दत्तकवस्ती चांगली असली तरी त्यांच्या योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनसेचे मंगेश सातमकर यांनी केला. या दत्तक वस्तीत युनिटप्रमाणे माणसे नसतात असे त्यांनी सांगितले.



हेही वाचा - 

कचरा विल्हेवाटीची सक्ती म्हणजे भष्टाचाराचं नवं कुरण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा