Advertisement

सहायक आयुक्तांवरही कारवाई करा

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील हेरिटेज इमारतींच्या दुरूस्ती कामाकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अनधिकृत बांधकामांमध्ये नगरसेवकाचा सहभाग असल्याचा किंवा त्याला पाठिंबा दिल्याचं आढळून आल्यास नगरसेवकांना निलंबित केलं जातं, मग विभागाच्या सहायक आयुक्तांना हा न्याय का नाही ? असा सवाल करत राजा यांनी ए विभागाच्या सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली.

सहायक आयुक्तांवरही कारवाई करा
SHARES

मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पुन्हा एकदा सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे. महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील हेरिटेज इमारतींच्या दुरूस्ती
कामाकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
अनधिकृत बांधकामांमध्ये नगरसेवकाचा सहभाग असल्याचा किंवा त्याला पाठिंबा दिल्याचं आढळून आल्यास नगरसेवकांना निलंबित केलं जातं, मग विभागाच्या सहायक आयुक्तांना हा न्याय का नाही ? असा सवाल करत राजा यांनी ए विभागाच्या सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली.


तक्रारीनंतरही कारवाई नाही

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील जीपीओ समोरील गोकूळधाम इमारतीचं मागील ४ महिन्यांपासून काम सुरू आहे. ही इमारत हेरिटेज आहे. तरीही या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या कामाकडे ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुदद्याद्वारे केला आहे. यासंदर्भातील तक्रार करूनही या बांधकामावर कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


मरोळमध्येही असाच प्रकार

मरोळमध्ये गोल्डनपुरी इमारतीचंही याचप्रकारे अनधिकृत बांधकाम झालं असून मागील एक वर्षांपासून तक्रार करूनही परिमंडळाचे उपायुक्त आणि विभागाचे सहायक आयुक्त या तक्रारींची दखलच घेत नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला.


झोपड्यांना पाणी पुरवठा

पूर्व द्रूतगती महामार्गाच्या टोकाला असलेल्या मुलुंडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या वसलेल्या असल्याचं भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितलं. याच जागेवर उद्यानासाठी राखीव भूखंड असून त्याला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही. परंतु याच ठिकाणी वसलेल्या झोपड्यांना महापालिका पाणी पुरवठा करत असल्याची तक्रार शिंदे यांनी केली.



हेही वाचा-

आयुक्तांच्या वृक्षतोडीच्या विशेषाधिकारांना चाप

क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात न्यायालयाचा अवमान?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा