Advertisement

मुलुंड अगरवाल रुग्णालयाची निविदा पुन्हा रद्द


मुलुंड अगरवाल रुग्णालयाची निविदा पुन्हा रद्द
SHARES

मुलुंडमधील एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या पुनर्बांधणीची निविदा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या विकासाला खिळ बसली आहे. मुलुंड आणि आसपासच्या काही खासगी रुग्णालयांना फायदा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक या निविदा रद्द केल्या जात असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे. त्यामुळे याची चौकशी लावून चुकीचा अंदाजपत्रक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गंगाधरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


अातापर्यंत सर्व निविदा रद्द

आतापर्यंत काढलेल्या ३ ते ४ निविदा कमी प्रतिसाद म्हणून तर कधी अंदाजित दरापेक्षा ५० टक्के अधिक दराने आल्याने बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे माझ्या पहिल्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत ही निविदा पूर्ण करून कामाचा शुभारंभ करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते भंग पावले असल्याची खंत गंगाधरे यांनी व्यक्त केली. खरोखरच हे रुग्णालय बनवण्याची मानसिकता आहे का? असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.


खासगी रुग्णालयांचा धंदा बंद?

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये असून त्यांचा धंदा कुठे तरी कमी होईल, या भीतीनं या रुग्णालयाच्या बांधकामाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंलुंडमधील एम. टी. अगरवाल महापालिका रुग्णालयाबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर बैठक पार पडली तसेच तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि विद्यमान अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्यासोबत रुग्णालयांची पाहणी करून चर्चा केली.


निविदा अाराखडा तयार

त्यानुसार या रुग्णालयाचा निविदा आराखडा तयार निविदा मागवण्याची प्रक्रिया राबवली गेली. परंतु मुलुंडकरांना हे रुग्णालय वेळेवर उपलब्ध करून न देता येथील गरीब रुग्णांना या वैद्यकीय सेवेपासून वंचित ठेवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा -

नगरसेवक निधीतील २५ कोटी गेले वाया, सत्ताधारी अपयशी

मुंबई मंडळाच्या लॉटरीत कोकण मंडळाचा खोडा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा