Advertisement

बुधवारी ठाण्यातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद

बुधवारी 'या' भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

बुधवारी ठाण्यातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद
SHARES

बुधवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पिसे इथल्या रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसवण्यात येणार आहे. तसंच इतर अत्यावश्यक कामेही करण्यात येणार आहेत.

'या' भागांचा पाणीपुरवठा बंद

  • घोडबंदर रोड
  • पातलीपाडा
  • हिरानंदानी इस्टेट
  • ब्रम्हांड
  • विजयनगरी
  • गायमुख
  • बाळकुम समतानगर
  • आकृती
  • सिद्धेश्वर
  • जॉन्सन
  • इंटर्निटी
  • कोलशेत
  • आझादनगर

बुधवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. तसंच नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करुन पालिकेस सहकार्य करावं, असे आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे.


मुंबईच्या विविध भागातून गेल्या वर्षभरात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी सरासरी ०.९ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.

मशीद बंदर, भायखळा, वडाळा, परळ, दादर, धारावी या भागातील दूषित पाण्यात गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. मुंबईकरांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची दरवर्षी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जल अभियंता विभाग संयुक्तपणे गुणवत्ता तपासते. दररोज २०० ते २५० आणि पावसाळ्यात ३०० ते ३५० जल नमुने प्रयोगशाळेत अणुजीवशास्त्रीय विश्लेषणासाठी पाठवले जातात.

मुंबईच्या २४ विभागांतून हे नमुने पाठवले जातात. प्रत्येक विभाग कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, साहाय्यक अभियंता गळती विभाग, साहाय्यक अभियंता गुणवत्ता विभाग, साहाय्यक अभियंता जलकामे अशा विभागांतील कर्मचाऱ्यांमार्फत जलाशयातील तसेच जलवितरण प्रणालीतील पाणी नमुने गोळा करून ते दादरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात.



हेही वाचा

मुंबईतील 'या' भागात दूषित पाणी

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीस २६६ केंद्रे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा