Advertisement

ठाणे : TMC कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनचा नवा लेआउट प्लॅन तयार करणार

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील वाहतूक नियोजनशून्य आहे.

ठाणे :  TMC कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनचा नवा लेआउट प्लॅन तयार करणार
SHARES

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनची पुनर्रचना करण्यास सांगितले आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. 

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील वाहतूक नियोजनशून्य आहे. मोकळ्या मैदानात वाहने ये-जा करीत असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग यामध्ये नियोजन नाही, असे बांगर म्हणाले. 

कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत सर्रासपणे अंमली पदार्थांचे सेवन करताना गर्दुले दिसतात. काही जण अनधिकृत कार पार्किंगही करतात.

याला आळा घालण्यासाठी अस्वच्छ जागा साफ करून त्यावर नियंत्रण आणून अधिकृत पार्किंगची स्थापना केली जाईल. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. जागेच्या वापराबरोबरच महापालिकेला त्यातून उत्पन्नही मिळणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

त्याचबरोबर वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक 22 वरील पासपोर्ट कार्यालयात अधिकृत पार्किंगसाठीही निविदा मागविण्यात येत आहेत. या भागात अनधिकृत पार्किंग केले जाते आणि तेवढेच शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत पालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पावसाळ्यात विटावा पुलाखाली साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आयुक्तांनी टीएमसीच्या अधिकाऱ्यांना वाहतूक पोलिसांसह जागा तपासण्यास सांगितले आहे. त्याशिवाय चौकातील सिग्नलच्या आवश्यकतेचा आढावा घेण्यास सांगितले आहे.



हेही वाचा

गोराई बीच आणि पॅगोडा यांना जोडणाऱ्या महात्मा फुले रोडचा विस्तार

वरळीतील 'हा' भाग नो-पार्किंग झोन म्हणून घोषित करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा